संपादकीय

बीड – परळी रोडच्या गुत्तेदाराला लोकांचा जीव घ्यायचं लायसन दिलं आहे का? – धनंजय गुंदेकर

बीड – परळी रोडच्या गुत्तेदाराला लोकांचा जीव घ्यायचं लायसन दिलं आहे का? – धनंजय गुंदेक
बीड (प्रतिनिधी) जिल्ह्यातील महत्वाचा असणाऱ्या बीड – परळी रोडचे काम हे शहरातील बार्शी नाका ते जरूड फाटा दरम्यान सुरू आहे. या कामाला एकतर खूप संथ गती आहे. त्यातही जे काम चालू आहे त्यात लोकांचा जीव घेण्याचे कामच या गुत्तेदार कडून सुरू असून यासंबंधी लक्ष देणारी यंत्रणा झोपा काढतेय की काय अशी परिस्थिती आहे. याबाबत आवाज उठवला जाणार असल्याचे धनंजय गुंदेकर यांनी म्हंटले आहे.
  बीड – परळी रोडवरील जरूड ते शिवणी फाटा दरम्यान असलेल्या शिवावरील पुलाचे काम झालेले असताना तेथील मातीचे ढिगारे ऐन मध्येच टाकलेले आहेत, त्या ठिकाणी दोन्ही बाजूने असलेल्या रस्त्याच्या कडेला असलेले खड्डे साक्षात यमदेवाचा मुक्काम असल्यागत असून गेल्या २ – ३ दिवसांत तेथे गंभीर अपघात झाले आहेत. या ठिकाणी २ वेगवेगळ्या अपघात हात मोडण्यापासून ते कायमचे अपंगत्व आलेला अपघात घडला मात्र याकडे ना कुणा अधिकाऱ्याने लक्ष दिले ना कुणी याबाबत कारवाई केली. ज्यांचा अपघात झाला ते तत्काळ उपचार घेण्यासाठी दवाखान्यात पोहोचून नशिबाला अन् व्यवस्थेला दोष देत अन्याय सहन करणारे बनले, मात्र हे किती दिवस? तो शिवावरील, जरूड फाट्याच्या समोरील ब्लॉक, नदीवरील पूल, घोडका राजुरीच्या तळ्यातील पाणी आटले तरी तेथील दोन्ही पुलाचे काम हे सगळे रखडलेले आहे. सबंधित गुत्तेदार शासनाचा जावई असल्यासारखे वागत असून त्यांना काय लोकांचा जीव घ्यायचे लायसन दिले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे धनंजय गुंदेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे म्हंटले आहे.
Back to top button