📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

पद्मपाणी राज्य राष्ट्रीय पुरस्कार जाहीर; हाजारे, सावंत, मुळे, नागरगोजे, उपाध्ये, यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर  ४ मे रोजी थाटात होणार वितरण

पद्मपाणी राज्य राष्ट्रीय पुरस्कार जाहीर; हाजारे, सावंत, मुळे, नागरगोजे, उपाध्ये, यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर  ४ मे रोजी थाटात होणार वितरण
बीड दि.१८ (प्रतिनिधी):-बीड शहरात मागील 1७ वर्षापासून संविधान दिनाच्या अनुषंगाने विविध क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या गुणवंत व्यक्तींना पद्मपाणी प्रतिष्ठानच्या वतीने
“पद्मपाणि” राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानीत केले जाते. या वर्षीच्या या पुरस्कारासाठी बीड जिल्ह्यासह राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गुणवंत कर्तुत्ववान व्यक्तीच्या कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी विविध क्षेत्रातील गुणवंत कर्तुत्ववान व्यक्तीची निवड करण्यात आली असून 04 मे रोजी बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते या पुरस्काराचा वितरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप तरकसे यांनी दिली.
  यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे यामध्ये
दै.लोकाशाचे निवासी उपसंपादक उत्तम हजारे, दै. रिपोर्टर बीड चे कार्यकारी संपादक गणेश सावंत, दै. पुढारी न्यूजचे  बीड जिल्हा प्रतिनिधी उदय नागरगोजे, दै. लोकनायकच्या  संपादिका सौ अक्षरा मुळे, दैनिक दिव्य मराठीचे  ब्यूरोचिप अमोल मुळे, साप्ताहिक आदर्श पोलखोलचे संपादक नितेश उपाध्ये यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. असे जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप तरकसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकांद्वारे दिली आहे.
Back to top button