राजकीय

संजय राऊतांचे सूचक विधान खुलासा | भाजपाचा बुरखा फाडणार, आणखी १० व्हिडिओ देणार

 

मुंबई | एनसीबी अधिकारी समीर वानखडे मुंबई क्रुझ रेव्ह पार्टीवर छापेमारी करताना अटक केली आहे. आर्यन खान याला ड्रग्जचं सेवन करत असल्याचा आरोप एनसीबी’ने केला आहे. या प्रकरणानं सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच आता समीर वानखेडे यांच्या विरोधात पूणर महाविकास आघाडी मैदानात उतरली असून आता संजय राऊत यांनी सूचक विधान केले आहे. एनसीबीच्या धाडसत्राचे धागेदोरे मुंबईतच नव्हे, तर दिल्लीपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी राऊत यांनी केली आहे.

राऊत यांनी नुकतंच आर्यन खान प्रकरणी एक व्हिडिओ ट्विट केला होता. यात फरार किरण गोसावी, आर्यन खान आणि कथित सॅम डिसोजा दिसून येत आहेत. या व्हिडिओची सीबीआय चौकशीची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. यावर संजय राऊत यांनी भाजपावाल्यांनी जरुर याची सीबीआय चौकशी करावी.

पुढे राऊत म्हणतात की, सीबीआय काय तुमच्या खिशात आहे का? तुम्हीही अनेक व्हिडिओ बाहेर आणले. पण आज तुमच्या काळजावर वार झाला म्हणून चौकशीची मागणी करताय का?, असा सवाल उपस्थित केला. तसंच मंत्री नवाब मलिक यांनी तर फक्त इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली आहे. इंटरव्हलनंतरची खरी स्टोरी मी सांगणार आहे. येत्या काही दिवसांत असे १० व्हिडिओ मी देणार आहे. यात भाजपाचे लोक कुठे-कुठे बसलेत ते सगळं समोर आणणार आहे असा दावाच त्यांनी केला आहे. यावर आता भाजपा काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.

Back to top button