तारकेश्वर गडाच्या विकासासाठी कटिबद्ध आ. सुरेश धस

तारकेश्वर गडाच्या विकासासाठी कटिबद्ध आ. सुरेश धस
*आष्टी (प्रतिनिधी) :* श्री क्षेत्र तारकेश्वर गड (महिंदा, ता. आष्टी) येथे श्री संत गुरुवर्य नारायण बाबा महाराज यांच्या १५ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित सप्ताह सांगता कार्यक्रमात आ.सुरेश धस यांनी उपस्थित राहून भाविकांशी संवाद साधला.
ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या धार्मिक सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती लाभली.
यावेळी आमदार धस यांनी श्री तारकेश्वराचे दर्शन घेत गुरुवर्य नारायण बाबा महाराज यांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले. “गुरुवर्य बाबांच्या आशीर्वादामुळेच मला जनसेवेची संधी मिळाली,” अशी कृतज्ञ भावना व्यक्त केली. तारकेश्वर गडावर प्रत्येक वेळी येताना त्या आशीर्वादांची जाणीव नव्याने होत,असल्याचेही यावेळी आ.धस यांनी यावेळी सांगितले.
तारकेश्वर गड हा आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या सीमेवर असून अत्यंत महत्त्वाचा आणि भक्तांचे श्रद्धास्थान असून पाथर्डी,शेवगाव, शिरूर कासार आणि आष्टी परिसरातील हजारो भाविक येथे नियमित दर्शनासाठी याठिकाणी येतात.या पवित्र स्थळी जाण्यासाठी रस्त्याची अडचण आहे हे मी मान्य करत असल्याचे सांगत
भाविकांच्या या अडचणीची गंभीर दखल घेत आमदार धस यांनी राज्य शासनाच्या हॅम योजनेअंतर्गत महिंदा ते खडकत या रस्त्याच्या सिमेंट काँक्रेटीकरणाच्या कामास मंजुरी मिळाल्याची माहिती दिली. तसेच येत्या वर्षभरात या कामास प्रत्यक्ष सुरुवात होईल, असा ठाम विश्वास त्यांनी नागरिकांना दिला. या निर्णयामुळे तारकेश्वर गडाकडे जाणाऱ्या मार्गाचा कायापालट होणार असून भाविकांची सोय मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे सांगितले.
तसेच गडाच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमी कटिबद्ध असल्याचेही आ.धस यांनी सांगितले.
या प्रसंगी ह.भ.प. तुकाराम महाराज मुंढे, ह.भ.प. रोहिदास महाराज गर्जे, ह.भ.प. अनिल देवळकर महाराज यांच्यासह राहुल राजळे, विक्रम राजे भोसले, गणेश आव्हाड, अंकुश चितळे, अनिल मोहिते, दिनकर तांदळे, आजिनाथ सानप, सरपंच दहिफळे, माणिक दहिफळे, विठ्ठल गर्जे, शंकर मिसाळ, विष्णु दहिफळे, वसंत मिसाळ तसेच पंचक्रोशीतील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



