बीड

केज मध्ये अवकाळी पाऊस व वादळाचा कहर , शेतकऱ्यांच्या मदतीला शिवसेना सरसावली

केज मध्ये अवकाळी पाऊस व वादळाचा कहर , शेतकऱ्यांच्या मदतीला शिवसेना सरसावली
शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी
बीड (प्रतिनिधी)  केज तालुक्यातील युसूफ वडगाव महसूल मंडळ आणि परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. तसेच वीज कोसळून मृत्यू झालेल्या शेतकरी दिगांबर भीमराव ससाणे यांच्या कुटुंबीयांना शासनाने त्वरित मदत जाहीर करावी, अशी मागणी करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
सोमवारी युसूफ वडगाव महसूल मंडळ परिसरात ताशी ९० ते १२० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे धनेगाव, नायगाव, सादोळा, भालगाव, बावची, सोने सांगळी, सुर्डी, थापरी आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झाडे उन्मळून पडली असून वीज तारा तुटल्या आहेत. अनेक ठिकाणी रोहित्र कोसळल्याने वीजपुरवठाही विस्कळीत झाला आहे. तसेच शेतीपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या दरम्यान सोनीजवळा येथील शेतकरी दिगांबर भीमराव ससाणे यांचा अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
——————-
मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करा
अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात यावी तसेच मृत शेतकरी दिगांबर ससाणे यांच्या कुटुंबीयांना विशेष आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी  शिवसेनेच्या माजी आमदार सौ संगीता ताई ठोंबरे ,शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन भैया मुळूक, श्री पृथ्वीराज पाटील शिवसेना तालुकाप्रमुख,श्री दादासाहेब ससाने विधानसभा प्रमुख,श्री दत्तकुमार काकडे युवा सेना तालुकाप्रमुख,श्री महेंद्र चाटे तालुका उपप्रमुख,विकास काशीद तालुका सचिव,आकाश चाळक युवा सेना शहर प्रमुख ,प्रकाश गुंड ज्येष्ठ शिवसैनिक,आदित्य राजनकर शेतकरी सेना तालुकाप्रमुख,योगेश देशमुख उपतालुकाप्रमुख, शिवशंकर नाईकनवरे शिवसैनिक, ज्ञानेश्वर भांगे युवा सेना उप तालुकाप्रमुख, विश्वासराव जाधव तालुका संघटक, शिवाजी गायकवाड युवा सेना उपतालुकाप्रमुख ,संतोष बुडूक ज्येष्ठ शिवसैनिक ,अशोक जोगदंड ज्येष्ठ शिवसैनिक,अजय तांबे ,शुभम गंभीरे, पृथ्वीराज इंगळे, आदेश देशमुख, स्वप्निल पवार, विलास घुले, उमेश माने, बापू गालफाडे, आसिफ शेख, श्रीराम कदम, बब्रुवान इंगळे, महादेव कदम, अजय तांबे यांनी केली आहे.
Back to top button