📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

लोकनेते मुंडे साहेबांची  पुण्यतिथी आपापल्या गावात, घरीच करा – ना.पंकजाताई मुंडे यांचे आवाहन

लोकनेते मुंडे साहेबांची  पुण्यतिथी आपापल्या गावात, घरीच करा – ना.पंकजाताई मुंडे यांचे आवाहन*

*देशातील सद्यस्थिती व पंतप्रधान मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद*

मुंबई, दि. २६—
लोकनेते गोपीनाथराव मुंडे सर्वांचे श्रद्धास्थान व ऊर्जास्थान आहे. दरवर्षी तीन जून आला की प्रत्येकाच्या मनात हुरहूर लागून जाते. आपल्या लोकनेत्याच्या आठवणीने आजही लाखोंचा जनसागर गोपीनाथ गडावर तीन जूनला दाखल होतो. मात्र सद्य परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद त्याचबरोबर पेट्रोल डिझेलचा वापर कमी करून सर्वांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने गोपीनाथ गडावर न येता सर्वांनी आहे त्या ठिकाणी, आपापल्या घरात व गावात पुण्यतिथी करावी असे आवाहन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची ३ जून ला पुण्यतिथी असते. त्या निमित्ताने गोपीनाथराव मुंडे यांची समाधी असलेल्या गोपीनाथ गडावर दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जनसागर  येत असतो.मात्र गोपीनाथराव मुंडे यांना अभिप्रेत असलेली जनकल्याणाची कामे करणे, ज्यांचा कोणी वाली नाही त्यांचा वाली होणे, ज्यांची वाणी नाही त्यांची वाणी होण्याचा प्रयत्न करणे हे विचार आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. तीन जून जवळ आला की प्रत्येकाला हुरहूर लागलेली असते. मात्र सध्य परिस्थिती पेट्रोल डिझेलचा तुटवडा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन या दृष्टीकोनातून कोणाचीही गैरसोय होणार नाही यासाठी आपण गोपीनाथ गडावर येण्याचे टाळावे.आपापल्या गावात व आपण आहात त्या ठिकाणी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची पुण्यतिथी करा.त्यांच्या विचाराला साजेसे उपक्रम साजरे करा. त्यामुळे गोपीनाथ गडावर  मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. सर्वांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन व पेट्रोल डिझेल वापर टाळण्यासाठी यावर्षी गावागावात पुण्यतिथी करावी असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.
••••

Back to top button