देशविदेश

पंजाबच्या निवडणुकीत शिवसेना दाखल, काँग्रेसच्या वाढवणार अडचणी

 

पंजाब | पंजाब विधानसभा निवडणुकीला अवघे महिने शिल्लक राहिलेले असताना त्यापूर्वी पंजाबमध्ये मोठी राजकीय उलटापालट झाली होती. त्यात बंडखोर माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी नव्या पक्षाची घोषणा केलेली असताना आता दुसरीकडे शिवसेना सुद्धा येणाऱ्या पंजाब निवडणुकीत आपले नशीब आजमावणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना प्नजाबमध्ये उतरणार आहे. मात्र दुसरीकडे सेनेच्या पंजाबमधील प्रवेशाने काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचं दिसत आहे. तसेच कॅप्टन अमरिंदर सिंग आता नवीन पक्ष तयार करणार असून भाजपसोबत सर्शत आघाडी करण्याच्या तयारीत आहेत. यावर अदयाप सेनेच्या नेत्यांनी दुजोरा दिलेला नाहीये,

भाजपमधून येणाऱ्या नेत्यांना काँग्रेसमध्ये घेता, तेव्हा धर्मनिरपेक्षता कुठे जाता?, असा सवाल अमरिंदर सिंग यांनी केला आहे. तुम्ही महाराष्ट्रात काँग्रेससोबत काय करता काँग्रेस अनुकूल असेल तेव्हा धर्माच्या आधारे राजकारण करणं योग्य असतं का याला संधीसाधू राजकारण म्हणत नाहीत का?, असे सवाल करत अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता.

Back to top button