देशविदेश

मर्सिडीज, फ्लॅट बोनस म्हणून देणारे हिरे व्यापारी ढोलकीयांनी कर्मचाऱ्यांना यंदा काय बोनस दिला

 

गुजरात | गुजरातचे प्रसिद्ध हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांनी कर्मचाऱ्यांना कोणते दिवाळी गिफ्ट दिले याबाबत उत्सुकता वाढलेली आहे. दर दिवाळीला चर्चेत असलेल्या सावजींनी अद्याप काही दिल्याचे ऐकिवात नाही. ना कुठे फोटो, ना कुठे बातमी. कर्मचाऱ्यांना शेकड्यामध्ये मर्सिडीज, फ्लॅट देणारे सावजी यंदा नरमल्याचे दिसत आहेत.

महागडी गिफ्ट कर्मचाऱ्यांना देत असल्याने सावजी खूप प्रसिद्ध आहेत. ते सोशल मीडियावरदेखील कमालीचे अॅक्टिव्ह असतात. 3 नोव्हेंबरला त्यांचे शेवटचे ट्विट आहे. ते नेहमी दिवाळीच्या आदल्या दिवशी किंवा दिवाळी दिवशी ही महागडी गिफ्ट देतात. पण या दिवाळीला त्यांनी कर्मचाऱ्यांना महागडी गिफ्ट देण्याचे टाळल्याचे दिसत आहे.

सावजी ढोलकियांनी यंदा कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट दिले असेल पण ते तेवढे महागडे नसेल असे बोलले जात आहे. जरी दिले असेल तरी त्याची माहिती सार्वजनिक केलेली नाही. जर त्यांनी तसे गिफ्ट दिले असते तर त्यांनी ते जरूर ट्विटरवर पोस्ट केले असते. सावजी हे दर दिवाळीला आपला खजिना कर्मचाऱ्यांवर रिता करतात. २०१४ मध्ये त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ४९१ कार आणि २०७ फ्लॅट दिले होते. २०१८ मध्ये त्यांनी आपल्या तीन कर्मचाऱ्यांना मर्सिडिज बेंझची एसयुव्ही दिली होती. त्यांच्या हरि कृष्णा एक्सपोर्ट्स या हिऱ्यांचा व्यापार करणाऱ्या कंपनीत 5000 हून अधिक लोक काम करतात.

Back to top button