तुमचा धर्म कोणता विचारून पेहेलगाम येथे केलेल्या भ्याड हल्ला प्रकरणी शिवसेना शिंदे गट अक्रमक

अतिरेक्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची निवेदनाव्दारे केली मागणी
द. रा जि. उपसंपादक: संतोष उध्दरकर.
म्हसळा: दि. २३ एप्रिल रोजी जम्मु काश्मिर मध्ये पेहेलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या भारतीय हिंदु पर्यटकांवर तुमचा धर्म कोणता विचारून निष्पाप हिंदू पर्यटकांना गोळ्या घालून मारण्यात आले होते. या मध्ये २८ जणांना आपले प्राण गमवावे लागले, याचे पडसाद संपूर्ण देशात पसरून ठिकाठकाणी निषेध करण्यात येत आहे, म्हसळा शिवसेना ( शिंदे गट ) या पक्षाकडुन म्हसळा पोलिस ठाणे, तहसिलदार यांना निषेधार्थ निवेदन देऊन या अतिरेक्यावर कठोरात कठोर कारवाई करून यांना पण त्याच ठिकाणी गोळ्या घालून ठार मारण्याची मागणी करण्यात आली. यावेळी तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले, युवा तालुका प्रमुख स्वप्नील चांदोरकर, शहर प्रमुख पवन भोई, उपतालुका प्रमुख बाबु बनकर, राजेश पदरथ,विभाग प्रमुख दिपेश जाधव, अरविंद शिंदे, हरी नाक्ती, प्रविण तांबे तसेच महिला आघाडी उपस्थित होते.



