बीड
शहरातील विविध विषयांवर आ.संदीप क्षीरसागरांनी घेतला नगर परिषदेत आढावा

शहरातील विविध विषयांवर आ.संदीप क्षीरसागरांनी घेतला नगर परिषदेत आढावा
*महत्वाचे विषय तातडीने मार्गी लावण्याच्या दिल्या सूचना*
बीड दि.१३ (प्रतिनिधी):- बीड शहरातील नागरिकांसाठी महत्वाच्या असलेल्या विषयांवर आ.संदीप क्षीरसागर यांनी बुधवारी (दि.१३) रोजी आढावा बैठक घेतली. या बैठकीत शहारातील नागरी प्रश्नांवर सविस्तर आढावा घेऊन महत्वाचे असलेले विविध प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना आ.क्षीरसागर यांनी मुख्याधिकारी आणि नगरपरिषद प्रशासनाला केल्या.
बीड शहरातील अनेक नागरी प्रश्न प्रलंबित आहेत. याबाबत आ.संदीप क्षीरसागर सातत्याने शासन, प्रशासन स्तरावर पाठपुरावा करत आहेत. या अनुषंगाने बीड नगरपरिषदेच्या स्तरावरील विविध प्रलंबित विषयांवर आढावा घेण्यासाठी बीड नगरपरिषदेचे नवीन मुख्याधिकारी शैलेश फडसे आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यासमवेत आ.संदीप क्षीरसागर यांनी बैठक घेऊन, सविस्तर चर्चा करून आढावा घेतला. तसेच बीड शहरातील नागरिकांसाठी महत्वाचे असलेले विविध प्रश्न प्रशासकीय स्तरावरून तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना आ.संदीप क्षीरसागर यांनी मुख्याधिकारी आणि नगरपरिषद प्रशासनाला केल्या आहेत. या बैठकीस माजी आ.सय्यद सलीम, बीड नगरपरिषदेतील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
*चौकट*
*शहरातील प्रलंबित ठेवलेले प्रमुख रस्ते ना.अजितदादांच्या पुढाकारातून लवकरच होणार*
बीड शहरातील प्रमुख असलेले छत्रपती शिवाजी महाराज चौक-राजूरी वेस-बलभीम चौक-धोंडीपुरा-सुभाष रोड, राजूरीवेस-बुंदेलपुरा-कटकटपुरा-सुभाष रोड, कारंजा-पिंगळे गल्ली-बुंदेलपुरा, नगर नाका ते पालवण चौक, राजू नगर ते अंकुश नगर या प्रमुख रस्त्यांच्या कामाला ना.अजित दादा पवार यांच्या पुढाकारातून लवकरच प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे. दरम्यान हे सर्व रस्ते ३ वर्षांपूर्वीच मंजूर झालेले आहेत. परंतु तात्कालीन पालकमंत्री यांनी जाणीवपूर्वक, श्रेयवादातून बीड शहरातील रस्त्यांचे काम प्रलंबित ठेवण्याचे नियोजन केले होते. परंतु ना.अजित दादा पवार यांनी बीड शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्न लक्षात घेता तातडीने हे रस्ते करण्याच्या सूचना दिल्या असून लवकरच या रस्त्यांच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे.
*चौकट*
*बैठकीत चर्चा झालेले मुद्दे*
– भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवणे व सुशोभीकरण करणे.
– चालू असलेल्या विविध विकासकामांची सद्यस्थितीचा आढावा घेतला.
– शहरातील स्वच्छता व पाणी पुरवठा बाबत आढावा.
– बीड शहरातील पार्किंग व्यवस्था करणेसाठी प्रस्तावित जागा ३७ (ए) प्रस्तावावर निर्णय
– घरकुल योजना, विद्युत पुरवठा तसेच सार्वजनिक शौचालय उभारणीबाबत आढावा घेतला
– पेठ बीड भागातील मच्छी मार्केट इमारत व जुनी भाजी मंडई येथील मटन मार्केट इमारत तसेच सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स येथील भाजी मंडई इमारती बाबत आढावा घेतला.
– उर्दूघर च्या उभारणीसाठी जागा निश्चित करणे.
– कोंडवाडा नूतनीकरण बाबत आढावा घेतला.
– STPT plant बाबतच्या कामाचा आढावा घेतला.
– मोकाट जनावरांसाठी नुतन कोंडवाडा तयार करणे.
– लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दलितवस्ती योजनेतंर्गत अनेक विकास कामांना मंजुरी देण्याबाबत चर्चा केली.



