रत्नागिरी

ग्रामीण रुग्णालय मंडणगड येथील डिझेल अभावी वैद्यकीय सुविधा ठप्प : आदेशभाऊ मर्चंडे

 

मंडणगड प्रतिनिधी

मंडणगड ग्रामीण रुग्णालयामध्ये दोन दिवसांपूर्वी मौजे घराडी येथील महिला अर्चना विचारे गरोदर असल्याने तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात आली असता तपासणी करून झाल्यानंतर दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी घरी जाण्यासाठी शासकीय (१०२) रुग्णवाहिकेला संपर्क केला असता ॲम्ब्युलन्स मध्ये डिझेल ची उपलब्धता नसल्याने सदर महिलेला घरी सोडता येणार नाही ही बाब मंडणगड नगरपंचायतीचे नगरसेवक आदेशभाऊ मर्चंडे यांना कळताच त्यांनी ग्रामीण रुग्णालय ठिकाणी त्वरित धाव घेऊन त्या महिलेची विचारपूस करून ग्रामीण रुग्णालय मंडणगड येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले दोन तास अगोदर सुविधा केली आहे. परंतु ती महीला किमान ५ तास रुग्णालयात असुन ॲम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध झाली नाही यावरून एवढे निदर्शनास येते कि वैद्यकिय अधिकारी नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. असे आदेशभाऊ मर्चंडे यांनी सांगीतले. तसेच आदेशभाऊ मर्चंडे स्वतः रुग्णालयात उपस्थित असताना डॉक्टर सगरे हे फोन वर खोटे बोलत असल्याचे निदर्शनास येतं असून ही बाब अत्यंत गंभीर आहे. तसेच जनरेटर मध्ये गेले ४ दिवस डीझेल नसल्यानें एक्स रे व यावर आधारित सर्व सुविधा रूग्णांना मिळण्यास विलंब होत आहे. तसेच नियुक्त असलेल्या डॉक्टर च्या तिन्ही जागा रिक्त असल्याने तालुक्यातील नागरिक लवकरच मोठे जनआंदोलन उभे करतील असे नगरसेवक आदेशभाऊ मर्चंडे यांनी सांगितले.

Back to top button