बीड

सरकारी मीडिया मॉनिटेरिंग खाजगी संस्थेकडे देण्याचा महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला पत्रकार संघाचा विरोध डिजिटल मिडिया बीड जिल्हा व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा गेवराई च्या वतीने निवेदन देवून लेखणी बंद आंदोलन

*सरकारी मीडिया मॉनिटेरिंग खाजगी संस्थेकडे देण्याचा महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला पत्रकार संघाचा विरोध*
डिजिटल मिडिया बीड जिल्हा व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा गेवराई च्या वतीने निवेदन देवून लेखणी बंद आंदोलन
गेवराई /प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारने वृत्त वाहिन्या वृत्तपत्रे आणि डिजिटल माध्यमातून संकलन व विश्लेषण करण्याचे काम खाजगी संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पत्रकारितेच्या मूलभूत तत्त्वांना आणि लोकशाही मूल्यांना बाधा आणणारा असून माध्यमस्वातंत्र्यावर गंभीर आघात करणारा आहे.
पत्रकारितेचा मुख्य हेतू जनतेपर्यंत सत्य व वस्तुनिष्ठ माहिती पोहोंचवणे हा आहे.मात्र सरकारकडून या कामा साठी खाजगी संस्था निर्णयाचा निर्णय घेतल्याने बातम्यावर अप्रत्यक्ष सेन्सॉरशीप लादली जाण्याचा धोका आहे. हा निर्णय सरकार विरोधी मतप्रवाह दडपण्याचा आणि प्रसार माध्यमावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते.देशाच्या लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आणि पत्रकारितेच्या स्वतंत्र भूमिकेचे संरक्षण करण्या साठी आम्ही डिजिटल मिडिया व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,शाखा गेवराई च्या वतीने या निर्णयाला तीव्र विरोध करत आहोत.
सरकारने पारदर्शकता न ठेवता खाजगी संस्थेला हे काम सोपवणे म्हणजेच माध्यमावर नियंत्रण ठेवण्याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष प्रयत्न आहे. सरकारकडून लादलेली गेलेली ही अघोषित आणीबाणी त्वरित मागे न घेतल्यास आम्ही आज दिनांक १२ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्राचे संवेदन शील आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते स्व. यशवंतराव चव्हाण माजी मुख्यमंत्री यांच्या जयंती दिवशी राज्यव्यापी लेखणीबंद आंदोलन व निदर्शने केले आहेत. ही बाब पुरोगामी महाराष्ट्रात घडू नये असे आम्हाला वाटते.यासाठी आमच्या मागण्यांचा जाणीवपूर्वक विचार करून राज्य सरकारने खाजगी संस्थेमार्फत मिडिया मॉनिटरींग करण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा.यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश संघटक मा.संजय भोकरे,राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे,प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, राज्य समन्वयक नितीन शिंदे,प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमानी प्रदेश संपर्कप्रमुख वैभव विवेक स्वामी , डिजिटल मिडिया प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मिडिया बीड जिल्हा व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा गेवराई वतीने तहसीलदार यांना निवेदन देत लेखणी बंद आंदोलन करत सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.
यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अंकुश आतकरे, विभागीय उपाध्यक्ष सुनील पोपळे, डिजिटल मिडिया जिल्हाध्यक्ष अनिल आगुंडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई बीड जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कापसे, जिल्हा उपाध्यक्ष बापू गाडेकर, शेख सलमान, उपाध्यक्ष भागवत देशपांडे, राजेंद्र नाटकर, सचिव तुळशीराम वाघमारे, विष्णू राठोड, सतिष वाघमारे, कैलास हादगुले, ज्ञानेश्वर जाधव, अरविंद कुलकर्णी यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते
Back to top button