📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

भटके-विमुक्त कार्यकर्त्यांची केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांसोबत बैठक

भटके-विमुक्त कार्यकर्त्यांची केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांसोबत बैठक

जामखेड प्रतिनिधी ;-केंद्रीय सामाजिक न्याय कॅबिनेट मंत्री वीरेंद्र कुमार यांची भटके विमुक्त समुदायाच्या सोबत काम करणारे कार्यकर्ते यांच्या सोबत मुंबईमध्ये बैठक पार पडली. केंद्रीय भटके विमुक्त कल्याण बोर्ड यांच्या वतीने २० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील भटके विमुक्त समुदायाच्या सोबत काम करणाऱ्या विविध संस्था संघटना यांच्या प्रतिनिधीसोबत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री वरिंद्र कुमार यांची बैठक झाली. भटक्या विमुक्त समुदायाचे महाराष्ट्रातील विविध प्रश्न समजून घेण्यासाठी आयोजित बैठकीत कल्याण बोर्डाचे सदस्य प्रवीण घुगे, केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे सचिव अमित यादव, कल्याण बोर्डाचे सीइओ अप्पाराव तसेच निदेशक सुनील रंजन उपस्थित होते. भटक्या विमुक्त समुदायाचे प्रश्न सोडवण्यासाठी व कल्याणकारी योजनाची प्रभावी अंमलबजावणीसाठी सामाजिक न्याय विभागाने स्थापन केलेल्या भटके विमुक्त कल्याण बोर्डच्या वतीने देशातील विविध राज्यात तेथील भटके विमुक्त समुदायाचे प्रश्न समजून घेतले जात आहेत. महाराष्ट्रातील प्रवीण घुगे या बोर्डाचे सदस्य आहेत. महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त समुदायाच्या प्रतिनिधींनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी राज्यभरातून प्रतिनिधी उपस्थित होते. यात नागरिकत्व पुरावे, स्वतंत्र मंत्रालय, बजेट, परदेशी शिष्यवृत्ती, भटक्या जमातीसाठी अन्याय अत्याचार प्रतिबंध कायदा आदी मुद्द्यांवर प्रतिनिधींनी भूमिका मांडली. पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री यांनी कार्यकर्ते यांच्या सोबत बैठक करून प्रश्न समजून घेतले.

Back to top button