📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जालना येथे 13 सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय वंजारी वधु वर परिचय मेळावा.         

जालना येथे 13 सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय वंजारी वधु वर परिचय मेळावा.
बीड ( प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सकल वंजारी समाजातील गरजू भावी वधू- वरांना योग्य जीवनसाथी मिळावा आणि समाजातील विवाह जुळविण्याच्या प्रक्रियेला चालना मिळावी, या सामाजिक उद्देशाने मागील ३२ वर्षापासून नियमित सेवेत असलेला एकमेव दिवाळीस प्रकाशित होणारा वंजारी परिवार (ग्रुप) कौटुबिक वधू-वर परिचय डिरेक्ट्री चे संस्थापक संपादक, कायदेशीर सल्लागार ॲड. बी. आर. जायभाय यांच्या माध्यमातून भावी वधू-वरांचा राज्यस्तरीय वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.हा मेळावा दि. १३ सप्टेंबर २०२६ वार रविवार रोजी सकाळी १०.३० वाजता, डॉ. प्रो. सुधाकर मांटे यांच्या सहकार्याने ठीकाण राजश्री शाहू इंग्लिश स्कूल व कॉलेज, मंठा रोड, जालना येथे आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी १०.३० वाजता भावी वधू-वरांची नाव नोंदणी कार्यक्रम स्थळी करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता मुख्य कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. या मेळाव्यात प्रमुख पाहुणे हे स्वतः भावी वधू-वरच असणार आहेत, ही या मेळाव्याची विशेष बाब आहे. राज्यस्तरीय वंजारी समाज वधू-वर मेळावा संपल्यानंतर आयोजकांच्या वतीने उपस्थितांसाठी विनामूल्य भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील बीड जिल्ह्यासह सर्व जिल्ह्यातील वंजारी समाजातील इच्छुक भावी वधू-वर, त्यांचे पालक, नातेवाईक व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमास आपले कर्तव्य आहे म्हणुन सहकार्य करावे, असे आवाहन आयोजक ॲड. बी. आर. जायभाय ,डॉ. प्रो. सुधाकर मांटे यांच्या वतीने करण्यात आले आहे. तरी बीड जिल्ह्यातील इच्छुक वधू वर व पालकांनी ॲड.बी.आर. जायभाय व डॉ. प्रो. सुधाकर मांटे यांच्या वतीने जालना येथील आयोजित 33 व्या राज्यस्तरीय वंजारी वधु वर परिचय मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अ. भा. संत भगवान बाबा वंजारी समाज ( वंजारी विश्व) वधु वर नोंदणी महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. संजय तांदळे यांनी केले आहे.
Back to top button