अनिषा ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे फुटबॉल, बॅडमिंटन व बुद्धिबळ स्पर्धेत घवघवीत यश

अनिषा ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे फुटबॉल, बॅडमिंटन व बुद्धिबळ स्पर्धेत घवघवीत यश
आष्टी : अनिषा ग्लोबल स्कूल, आष्टीच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय फुटबॉल, बॅडमिंटन आणि बुद्धिबळ स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत विजेतेपद पटकावले. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विजेत्या संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
हंबर्डे कॉलेज, आष्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या १४ वर्षांखालील मुलांच्या तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत अनिषा ग्लोबल स्कूलच्या संघाने शानदार विजय मिळवत विजेतेपद पटकावले. विजयी संघात अनघ मोहळकर, हर्षवर्धन काळे, कनिफनाथ मिसाळ, शंभू ओव्हाळ, अनुष पवार, प्रसाद साऊणे, साई खुळपे, श्रीराज मुरकुटे, अर्णव नवसरे, अथर्व ओमासे, अथर्व गायकवाड, विश्वजीत जगताप, सोहम संगाळे, अबान शेख, श्रीराम खेंगारे आणि यशराज शिंदे यांचा समावेश आहे.
तसेच कडा ग्रामपंचायत बॅडमिंटन हॉल, कडा येथे झालेल्या तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत अनिषा ग्लोबल स्कूलच्या मुली आणि मुलांच्या संघांनी विजेतेपद मिळविले. विजेत्या मुलींच्या संघात अनुष्का घोडके, स्वरा वराट, अनुष्का कांबळे आणि अनुष्का काळे यांचा समावेश होता. तर विजेत्या मुलांच्या संघात हर्षवर्धन काळे, अनघ मोहळकर, चैतन्य दहिकर, सिद्धार्थ कोठारी आणि शंभू ओव्हाळ यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
पिंपळेश्वर इंग्लिश स्कूल, आष्टी येथे आयोजित तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतही अनिषा ग्लोबल स्कूलच्या मुली आणि मुलांच्या संघांनी विजेतेपद पटकावले. विजेत्या मुलींच्या संघात पलक चोपडा, अनुष्का कांबळे, अनुष्का काळे आणि तेजस्विनी शिंदे यांचा समावेश होता. तर विजेत्या मुलांच्या संघात अनघ मोहळकर, आदेश पडोळे, मोहम्मद फाज खान, सक्षम टेकाळे आणि विराज पितळे यांनी विजय मिळविला.
या सर्व विजेत्या संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी दाखवलेली मेहनत, शिस्त, संघभावना, चिकाटी आणि क्रीडाभावना यामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक श्री. अजीम शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल श्री. पिंपळेश्वर महादेव देवस्थानचे अध्यक्ष श्री. सुरेश (अण्णा) धस, शाळेच्या कार्यकारी संचालिका सौ. प्राजक्ता धस, प्राचार्य श्री. अविनाश राऊत व कु. हरजोतकौर जोगी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हास्तरावरही विद्यार्थी उत्तम कामगिरी करून अनिषा ग्लोबल स्कूल आणि आष्टीचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.



