बीड
गाडी लावण्यावरून बीड जिल्हा न्यायालयात वकिलाला मारहाण

गाडी लावण्यावरून बीड जिल्हा न्यायालयात वकिलाला मारहाण
मारहाणीत वकिलाचा हात मोडला, गळ्यातील दोन तोळ्याची लॉकेट चोरीला गेले, दहा हजार रुपये कॅश चोरले गेले, पायांनी वकिलाचे जोरात नरडे दाबले.
बीड जिल्हा न्यायालयाच्या आवारात अॅड. राम पांडुरंग डोंगरे हे न्यायालयीन कामकाज करत असतांना विनाकारण राधाकिसन रामचंद्र करपे यांनी व इतर ५ ते ६ महिंला पुरुषांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी व अॅट्रॉसिटीची व विनयभंगाची केस दाखल करणेची धमकी दिल्यामुळे याचा जाहीर निषेध म्हणुन बीड जिल्हा वकील संघाचे सदस्यांनी दिनांक
२५/०२/२०२६ रोजी न्यायालयीन कामकाजामध्ये सहभाग न घेण्याचा निर्णय घेतल्या आहे.
बीड जिल्हा वकील संघाचे सदस्य अॅड. राम पांडुरंग डोंगरे हे बीड जिल्हा न्यायालय परिसरात वकील व नोटरी म्हणुन काम करतात. ते आज दिनांक २४/०२/२०२६ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या दरम्यान बीड जिल्हा न्यायालयात न्यायालयीन कामकाज करणेकरीता आले व ते त्यांचे काम करत असतांना त्यांच्या टेबलला लागुन राधाकिसन रामचंद्र करपे, रा. शाहूनगर, बीड ता.जि.बीड याने मोटार सायकल उभा केली, तेंव्हा ते त्यांना मोटार सायकल बाजुला लावा असे म्हणाले असता. “मी तुमच्या सोरच गाडी लावेल, काय करायचे ते कर” असे राधाकिसन रामचंद्र करपे हा म्हणाला त्यामुळे अॅड. राम डोंगरे यांनी स्वतः त्यांची मोटारसायकल बाजुला सरकवली तेंव्हा राधाकिसन करपे त्यांना म्हणाला की, तु वकील असुन लुच्या सारखे काम करतोस असे म्हणुन शिवीगाळ केली व त्यांच्यावर केसे करतो, थांब तुला दाखवतो असे म्हणुन रामचंद्र करपे तेथुन निघून गेला. त्यानंतर १० ते १५ मिनिटानंतर तो स्वतः व त्याच्यासोबत ३ बायका व इतर २ पुरुष घेवुन आला व अॅड. राम डोंगरे यांना अचानक मारहाण करायला सुरुवात केली व त्यांचा गळा दाबला. अॅड. राम डोंगरे यांनी त्यांचा गळा सोडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या गळयाला सदरील महिलांचे नखे लागली व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी देवुन अॅड. राम डोंगरे यांच्या विरोधात अॅट्रासिटीची व विनयभंगाची केस करतोत असे म्हणत ते तेथुन निघुन जातांना महिला म्हणत होत्या की, तुला बीड शहरात फिरु देणार नाहीत. तुझी नोटरी व वकिली करु देणार नाहीत अशा प्रकारची धमकी देवून राधाकिसन रामचंद्र करपे व इतर ३ महिला व २ पुरुष यांनी धमकी दिली आहे.
तरी मे. साहेबांना विनंती की, अॅड. राम पांडुरंग डोंगरे यांना राधाकिसन रामचंद्र करपे व इतर ३ महिला व २ पुरुष यांनी हानमार व शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देवुन नोटरी व वकिली करु देणार नाहीत अशा प्रकारची धमकी व तसेच अॅट्रॉसिटीची व विनयभंगाची केस करुत अशी धमकी राधाकिसन रामचंद्र करपे व इतर ३ महिला व २ पुरुष यांनी दिल्यामुळे याचा जाहीर निषेध म्हणुन बीड जिल्हा वकील संघाचे सर्व सन्माननीय सदस्यांनी दिनांक २५/०२/२०२६ रोजी न्यायालयीन कामकाजामध्ये सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे.



