📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

स्वच्छ गेवराई सुंदर गेवराईचे बाळराजे पवारांनी पाहिलेले स्वप्न साक्षात उतरून ते टिकविण्याचे काम नगराध्यक्षा गीताभाभी यांच्या माध्यमातून सुरू

स्वच्छ गेवराई सुंदर गेवराईचे बाळराजे पवारांनी पाहिलेले स्वप्न साक्षात उतरून ते टिकविण्याचे काम नगराध्यक्षा गीताभाभी यांच्या माध्यमातून सुरू
गेवराई (अंकुश आतकरे) पूर्वी गेवराई शहर खूप अस्वच्छ होते चौका चौकात कचऱ्याचे ढिगारे होते. त्यावेळेस बाळराजे दादा पवार यांनी स्वच्छ व सुंदर गेवराईचे स्वप्न पाहिले होते ते स्वप्न साक्षात उतरून वीस वर्षानंतर ही ते टिकविण्याचे काम पवार घराण्याकडून सातत्याने होताना पाहायला मिळत आहे. सौ. गीताभाभी बाळराजे पवार सध्या नगराध्यक्ष असून पहाटेच उठून सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाची पाहणी करतात व नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतात तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना सूचना देऊन त्यांच्याकडून चांगले काम करून घेत असल्याचे नागरिकांनी अनेकदा पाहिले आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे गेवराई शहर स्वच्छ व सुंदर दिसत आहे.
              पवार घराण्याचे गेवराई शहरावर विशेष लक्ष असून मागील वीस वर्षापासून गेवराई नगरपरिषद त्यांच्या ताब्यात आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे गेवराई शहरातील स्वच्छता. पहिल्यापासूनच पवार घराण्यांनी स्वच्छतेला जास्त महत्व दिले आहे. त्यांच्या ताब्यात नगरपरिषद आल्यापासून ते स्वतः पहाटे उठून सफाई कर्मचाऱ्यांच्या मागे फिरवून त्यांना वेळोवेळी सूचना करतात व गेवराई शहर स्वच्छ व सुंदर करून घेतात. त्यामुळे गेवराईकर ही त्यांच्यावर प्रेम करतात त्यांना आपला मतदान रुपी आशीर्वाद देतात. बाळराजे पवार व सौ. गीताभाभी हे सतत नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतात. ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिक व इतर कचरा याचे व्यवस्थापन कसे करायचे हे नागरिकांना सांगतात व त्याचे महत्त्व पटवून देतात शहरात फिरून कोणत्या भागात अस्वच्छता आहे कुठे कचऱ्याच्या ढिगारे आहेत का? हे स्वतः शहरात फिरून पाहणी करतात व कर्मचाऱ्यांना सांगून ते स्वच्छ करून घेतात स्वच्छ गेवराई सुंदर गेवराई हे बाळराजे पवार यांनी वीस वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न आजही पवार घराण्याकडून टिकून आहे. गीताभाभी बाळराजे पवार ह्या नगराध्यक्ष झाल्यापासून रस्त्यावर उतरून काम करतात त्यांना अनेकांनी पाहिलेले आहे. विशेषता म्हणजे त्यांनी स्वच्छतेच्या मोहीमेकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. गेवराई शहर स्वच्छ व सुंदर राहिलं तर शहरातील नागरिक हे सतत प्रसन्न व निरोगी राहतात असे ते वारंवार बोलत असून गेवराई करांकडूनही त्यांना स्वच्छतेबाबत चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.
चौकट
गेवराई शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी 130 ते 140 लेबर काम करत आहे.  त्यामध्ये 4 ट्रॅक्टर, 1 टेम्पो, 11 इंधन घंटा गाड्या, 6 सायकल घंटा गाड्या दररोज सकाळी 6 ते 2 पर्यंत स्वच्छतेचे काम चालते. सध्या सकाळी व्यापारी भागात दोन घंटा गाड्यांच्या साह्याने कचरा संकलन केले जातो. प्रत्येक घरावर QR कोड स्कॅन केला जातो. कॅरीबॅग मुक्त शहर बनवण्याचा संकल्प केला असून, प्रत्येक नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी कॅरीबॅग मुक्त शहर करण्यासाठी नगरपरिषद ला सहकार्य करावे. स्वच्छतेच्या बाबतीतील लोक चळवळ (मोहीम) निर्माण करायची आहे त्यासाठी नागरिकांनी पुढे यावे ही विनंती.
  सुशील भाऊ जवंजाळ
माजी नगराध्यक्ष न.प.गेवराई
चौकट
बाळराजे पवार व नगराध्यक्षा सौ. गिताभाभी पवार ह्या गेवराई शहराला आपले घर मानतात व शहरात राहणाऱ्या नागरिकांना आपल्या घरातील सदस्य घर जर स्वच्छ व सुंदर ठेवलं तर घरात राहणारे सदस्य प्रसन्न व निरोगी राहतात. त्याचप्रमाणे शहर जर स्वच्छ व सुंदर राहिले तर शहरात राहणारे नागरिक ही निरोगी व प्रसन्न राहतील त्यामुळे भाभींचे व दादांचे स्वच्छतेच्या बाबतीत जास्त लक्ष आहे.  स्वतः रस्त्यावर उतरून स्वच्छतेचे पाहणी करतात नागरिकांशी चर्चा करतात व त्यांच्या अडचणी सफाई कर्मचाऱ्यांना सांगून सोडवतात त्यामुळेच गेवराई शहर स्वच्छ व सुंदर झाले आहे.
 विष्णुपंत आतकरे
चौकट
स्वच्छ गेवराई सुंदर गेवराई आदरणीय बाळराजे दादा पवार यांचा मानस त्यांच्या पहाटे पासून गेवराई शहरातील प्रत्येक प्रभागात पाहणी करून घंटा गाडीच्या माध्यमातून पुर्ण झाला आहे माननीय नगराध्यक्षा गीता भाभी पवार सर्व सन्माननीय नगरसेवक मंडळी तसेच नगरपरिषद कार्यालयातील स्टाफ व स्वच्छता विभागातील कर्मचारी यांनी मिळून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे म्हणून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटले आहे नागरिक इतरत्र कचरा न टाकता ओला सुका कचरा वेगवेगळा ठेवून घंटा गाडीतच टाकतात त्यामुळे गेवराई शहरात स्वच्छता दिसून येते.
दादासाहेब (बाळासाहेब) विश्वनाथराव खंडागळे.
चौकट
गेवराई शहरात निकम गल्ली, खंडागळे गल्ली,साठे नगर, संतोष नगर, साठे नगर, संघमित्रा नगर, मोमीनपुरा, इस्लामपूरा, कोरबू गल्ली, कलपेश्वर मळा, संजय नगरनाल्या तुबलेल्या असुन मच्छरांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तरी याचे तातडीने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
श्याम गायकवाड
चौकट
गेवराई नगर परिषदच्या नगराध्यक्षपदी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित माजी आमदार लक्ष्मणराव पवार भाजपचे युवा नेते बाळराजे दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सौ. गीताभाभी बाळराजे पवार नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी गेवराई शहराच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले व बाळराजे पवार यांच्या स्वप्नातील स्वच्छ व सुंदर गेवराई कशी असते हे जनतेला दाखवून दिले.
 कृष्णा गोलांडे
 मॅनेजर चिंतामणी दूध संघ गेवराई
चौकट
गेवराई शहराला एका खंबीर आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची गरज होती ती आज श्रीमती गीताभाभी बाळराजे पवार यांच्या रूपाने पूर्ण झाली आहे. त्यांच्या निवडीनंतर अवघ्या काही दिवसांतच शहरात स्वच्छतेचे सकारात्मक चित्र दिसत आहे. राजकारण बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या ‘लोकप्रिय नगराध्यक्षा’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्या मनापासून शुभेच्छा!”
दशरथ पंडित
चौकट
गेवराई शहराला बाळराजे दादाच्या रूपाने स्वच्छ व सुंदर नेतृत्व मिळाल्याने गेवराईच्या विकासात मोठा संखेनेवाढ होत आहे. दादाचे आणि गीताभाभींची दूरदृष्टी नेतृवाने सुंदर गेवराई स्वच्छ गेवराई आज खाऱ्या अर्थाने दिसण्यास सुरुवात झाली आहे. गीताभाभी व बाळराजे दादा स्वतःहा उभा राहून गेवराई शहराची स्वच्छता करून घेतात याचा स्वार्थ अभिमान आम्हाला आहे. आमचे मत खाऱ्या अर्थाने विकासाला मिळाले.
ॲड. अमोल दाभाडे
चौकट
गेवराई नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ गेवराई सुंदर गेवराई हे वाक्य घेऊन गेवराई शहराच्या स्वच्छतेबाबत स्वतः बाळराजे दादा पवार व नगराध्यक्ष गीता भाभी पवार हे जातीने लक्ष देऊन गेवराई शहरातील प्रत्येक वार्डामध्ये जातीने लक्ष देऊन रस्ते नाले स्वच्छ करून घेत आहे त्यामुळे गेवराई शहरातील नागरिक व माझ्यासारखे अनेक जण गेवराई शहराच्या स्वच्छतेबाबत समाधानी आहोत
लक्ष्मण चव्हाण जिल्हाध्यक्ष बंजारा क्रांती दल बीड
चौकट
बर्‍याच कालावधीनंतर नपच्या निवडणुका झाल्या. त्याआधी, प्रशासकीय पातळीवर कामे सुरू होती. प्रशासनास काही वेळा मर्यादा, अडचणी येतात. मात्र, लोकसेवक म्हणून, नगराध्यक्ष, नगरसेवकांच्या उपस्थित कामाची गती वाढते, असा अनुभव आहे. त्यामुळे, गेल्या दोन तीन महिन्यांत गेवराई नपची स्वच्छता मोहीम वाढली आहे. अनेक वॉर्ड स्वच्छ केले जात आहेत. गेवराई नगर परिषदेवर भाजपाचे युवा नेते बाळराजे दादा पवार, माजी मंत्री ,लोकनेते बदामराव आबा पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराई शहरातील जनतेने एक हाती सत्ता दिली. शहरातील स्वच्छतेच्या संदर्भात, कामाची गती वाढली आणि मनुष्य बळ ही वाढले आहे. स्वतः बाळराजे पवार, नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. गीताभाभी पवार शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. गेल्या पंधरा, वीस वर्षांपासून गेवराई शहरातील जनतेने विश्वासाच्या बळावर सत्ता दिली आहे. सध्याचा कारभार पारदर्शक आणि गतीमान आहे. शहराच्या वैभवात भर पडतेय. रस्ता, नाली आणि स्वच्छता, ही बाब लक्षात घेऊन स्वच्छतेचा मोहीम राबविण्यात येत आहे. मला वाटत, नपचे नवे कारभारी आणि प्रशासन समन्वय ठेवून काम करतय, त्यामुळे, या मोहीमेवर समाधानी आहे.
सुभाष सुतार, ज्येष्ठ पत्रकार
गेवराई जि.बीड
चौकट
गेवराई शहराच्या स्वच्छतेबद्दल सांगायचं झालं तर ‘स्वच्छ गेवराई, सुंदर गेवराई’ हे वाक्य अगदी विरुद्ध आहे. ‘अस्वच्छ गेवराई, दुर्गंधीयुक्त गेवराई’ असे योग्य आहे. कारण सगळीकडे कचरा,घान, अस्वच्छता आहेच परंतु ज्या कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या आहेत त्याही वेळेत येत नाही. अनेक वेळा सांगुन ही घंटागाड्या या वेळेत येत नाही. घरातील कचरा आठ-आठ दिवस अक्षरशः गोण्या मधे भरुन ठेवावा लागतो. हे करताना कचरा घरातच ठेवलेला असल्याने परिसर सुद्धा अस्वच्छ होतो. यासोबतच अनेक ठिकाणच्या नाल्यांच पाणी थोडा जरी पाउस आला तरी नाल्या तुंबल्यामुळे रस्त्यावर यायला लागतं व अनेक ठिकाणी सखल भागात साचून दुर्गंधी पसरते. काही विशिष्ट भागात अतिशय स्वच्छता दिसते तर काही भाग अतिशय अस्वच्छ हा विरोधाभास कमी व्हायला हवा.
*मुक्ता दिगंबर आर्दड*
*विधानसभा क्षेत्र अध्यक्ष*
*राष्ट्रवादी महिला काँग्रेस* *गेवराई*
Back to top button