बीड
श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे जादा बसेस सोडाव्यात- डॉ.संजय तांदळे

श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे जादा बसेस सोडाव्यात-
डॉ.संजय तांदळे
बीड (प्रतिनिधी) : श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे जादा बसेस सोडाव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे यांनी केली आहे .श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे सद्गुरू संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या 25 व्या पुण्यस्मरणार्थ रौप्य महोत्सवी सोहळा दि. 7 जून 2025 ते 14 जून 2025 पर्यंत साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने परमपूज्य पंडित श्री प्रदीप मिश्रा महाराज( सिहोरवाले) यांचे शिवमहापुराण कथामृताचे आयोजन करण्यात आले असून ग्रंथराज ज्ञानेश्वरी परायण ज्ञान यज्ञ देखील होणार आहे . या सोहळ्याला लाखो भाविक भक्तांची उपस्थिती अपेक्षित असल्याने बीड सह जिल्ह्यातील सर्वच एस.टी.आगारातून चाकरवाडी येथे विशेष ज्यादा बसेस सोडाव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे, नितीन उपाध्ये ,नितीन जायभाये यांनी दि.5 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बीड आणि एस. टी .महामंडळाच्या विभाग नियंत्रक दुसाने यांना निवेदनाद्वारे केली आहे . या निवेदनानंतर विभाग नियंत्रक दुसाने यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी चाकरवाडी येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून बीड सह जिल्ह्यातील सर्वच स्थानकांतून ज्यादा बसेस उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाही दिली.



