मुंबई

नवाब मलिकांकडे इतके पुरावे आहेत मग कोर्टात का जात नाहीत? एनसीबीचा सवाल

 

मुंबई | आर्यन खान प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक सातत्याने एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. आता या प्रकरणात मलिकांनी आर्यन खानचं अपहरण करुन शाहरुख खानकडून वसुली करायची होती. आर्यनला त्याच्या मित्रांनी क्रुझवर नेले होते असा दावा केला. त्याचसोबत सॅम डिसुझा आणि एनसीबी अधिकाऱ्याच्या संभाषणाची क्लीप मलिकांनी जारी केली. त्यावरुन आता एनसीबीने सर्व आरोप फेटाळून मलिक यांना सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.

नवाब मलिक एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत आहेत. जर मलिकांकडे इतके पुरावे असतील तर ते कोर्टात का जात नाही? असा सवाल एनसीबी अधिकाऱ्यांनी केला आहे. आर्यन खान अपहरण आणि वसुली प्रकरणात समीर वानखेडेंचा सहभाग होता असा आरोप मलिकांनी केला. क्रुझ पार्टीचं तिकीट आर्यननं खरेदी केले नव्हते. प्रतिक गाभा आणि अमिर फर्निचरवाला यांनी त्याला पार्टीला बोलावलं होतं असं मलिकांनी आजच्या पत्रकार परिषदेत म्हटलं.

एनसीबी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या डिसुझा आणि वीवी सिंह यांच्यातील संभाषण नवाब मलिकांनी जारी केले. त्यात काहीही चुकीचं नाही. अधिकारी डिसुझा यांना फोनवरुन काहीही डिलीट करू नको. तुझा आयएमईआय नंबर माझ्याकडे आहे असा इशारा देत होते. समीर वानखेडे सॅम डिसुझाच्या संपर्कात नव्हता असं त्यांनी सांगितले आहे.

Back to top button