संपादकीय

मी राजकारण करतो मात्र सामान्य माणसाच्या भल्यासाठी राजकारण करू – शरद पवार

 

मी राजकारण करतो, मात्र सामान्य माणसाच्या भल्यासाठी राजकारण करू, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगरमध्ये केलं. अहमदनगरमधील श्रीगोंदा येथे शिवाजीराव नागवडे पूर्णाकृती पुतळा अनावरण समारंभाचा कार्यक्रम पार पडला. या समारंभाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, भाजप नेते हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. शनिवारी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरवात झाली.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, श्रीगोंदा येथील तत्त्वनिष्ठ व संयत नेतृत्व माजी आमदार स्व. शिवाजीराव नागवडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना समाधान वाटले. पुतळा अगदी हुबेहूब शिवाजीबापूंसारखा आहे. शिल्पकाराचे मनापासून कौतुक! शिवाजीराव बापूंनी सहकारी तत्वावर श्रीगोंदा साखर कारखाना उभा केला आणि पारंपरिक दुष्काळी भागाच्या विकासाला मोठा हातभर लावला. साखर कारखान्यानी आता साखरेसह इथेनॉल निर्माण करण्यासाठी प्राधान्य देणे गरजेचं आहे.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, कारखानदारी चालवायची म्हटल्यावर वाद विवाद असतात. पण वाद न करता यावर अनेक संसार उभे असल्याने बसून मार्ग काढणे गरजेचं आहे. विकासाच्या कामामध्ये सर्वांनी एकत्र आलं आलं पाहिजे. मी राजकारण करतो, मात्र सामान्य माणसाच्या भल्यासाठी राजकारण करू. 1978 साली मी मुख्यमंत्री झालो तेव्हा शिवाजीबापूंनी मला साथ दिली. आपल्या भागातील शेतकऱ्यांचे संसार सुधारले पाहिजेत, त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे, ही शिवाजीरावांची प्रामाणिक भूमिका होती. या परिसराच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांकरिता पुढील पिढ्या कायम त्यांचे स्मरण करतील.

Back to top button