बीड

जयभिम महोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल! जयभिम महोत्सवाचा आनंद घ्यावा संयोजन समितीचे आवाहन

जयभिम महोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल!
जयभिम महोत्सवाचा आनंद घ्यावा संयोजन समितीचे आवाहन
बीड / प्रतिनिधी
विश्‍वरत्न, बोधीसत्व, महामानव तथा राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीडच्या वतीने विविध कार्यक्रमाने साजरी होत आहे. हा जयभिम महोत्सव रविवार (दि.5) एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत साजरा होत असून  या महोत्सवात धम्मदेसना, व्याख्याने, आरोग्य, विद्रोही कवि संमेलन, रक्तदान शिबिरे, भिमगीत स्पर्धा, समता ज्योत मिरवणूक आदी विविध कार्यक्रमांची रेलचेल होणार आहे. तरी या जयभिम महोत्सवाचा सर्वांनी आनंद घ्यावा असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीने केले आहे.
दरवर्षी विविध परिवर्तनवादी व सांस्कृतिक कार्यक्रमाने समाजाच्या स्वबळावर जयभिम महोत्सव साजरा केला जातो. यावर्षीही विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीडच्या वतीने विविध परिवर्तनवादी कार्यक्रम हाती घेत साजरी होत आहे. या जयभिम महोत्सवाची सुरुवात रविवार (दि.5) एप्रिल पासून महापुरुष सामन्य ज्ञान स्पर्धा व धम्मदेसना कार्यक्रम घेवून झाली आहे. हा जयभिम महोत्सव 14 एप्रिल पर्यंत चालणार असून या दहा दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. विशेषतः म्हणजे बीडच्या सार्वजनिक जयभिम महोत्सवाचे कौतूक अवघ्या महाराष्ट्राने केलेले असून हा जयभिम महोत्सव आदर्श व प्रेरणा घालून देणारा ठरलेला आहे. जयभीम महोत्सवातील सर्व कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड शहर यांच्याकडून करण्यात आले आहे.
चौकट
असे होणार कार्यक्रम
सोमवार दि.6 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी 10 ते 5 पर्यंत रक्तदान शिबीर, सायं 7 वाजता एका वादळाची सांगिनी:मी रमाई नाटिका, मंगळवार  दि.7 रोजी दुपारी 12 वाजता महापुरुष वकृत्व स्पर्धा, सायंकाळी 7 वाजता चेतन चोपडे यांचा भव्य संगीत रजनी कार्यक्रम, बुधवार दि.8 रोजी सकाळी 11:30 वाजता चित्रकला स्पर्धा, सायंकाळी 7 वाजता प्रा.संदीप कदम यांचे व्याख्यान, गुरुवार दि.9 रोजी 11:30 वाजता विद्रोही कवि संमेलन, सायंकाळी 7 वाजता प्रा.जगदीश ओहोळ यांचे व्याख्यान, शुक्रवार दि.10 रोजी सकाळी 11:30 वाजता महिलांसाठी विविध स्पर्धा, सायंकाळी 7 वाजता प्रा.विलास खरात यांचे व्यख्यान, शनिवार दि.11 रोजी सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत 18 तास अभ्यास( तुलसी संगणक शास्त्र महाविद्यालय), सकाळी 8 वाजता क्रांतिसूर्य महात्मा फुले अभिवादन रॅली, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ते महात्मा फुले पुतळा,  सकाळी 11 वाजता भिमगीत गायन स्पर्धा, सायंकाळी 7 वाजता कमलाकांत काळे यांचे व्याख्यान, रविवार दि.12 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 8 पर्यंत भव्य नृत्य स्पर्धा सोमवार दि.13 रोजी अनिरुध्द वनकर यांचा भव्य संगीत रजनी कार्यक्रम (सेवादल मैदान, बाजार तळ पेठ बीड),रात्री  वाजता समता ज्योत, मंगळवार दि.14 रोजी सकाळी अभिवादन रॅली ( सामाजिक न्याय भवन ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा), सायंकाळी 6 ते 12 छ.शिवाजी महाराज पुतळा ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघणार आहे.
Back to top button