बीड
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत प्रहार शिक्षक संघटनेचे पालकमंत्र्यांना निवेदन – अविनाश तांदळे

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत प्रहार शिक्षक संघटनेचे पालकमंत्र्यांना निवेदन – अविनाश तांदळे
विविध मागण्या मान्य करण्याची मागणी
बीड ( प्रतिनिधी )
मुंबई येथे रामटेक या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन जालना जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या विविध प्रश्न संदर्भात मा.ना.श्रीमती.पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांना अविनाश तांदळे राज्य उपाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी निवेदन दिले.
यामध्ये मा. उच्च न्यायालय यांच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी देण्यात यावी , शिक्षकांचे समायोजन करताना आधी पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करून नंतर समायोजन करण्यात यावे , शिक्षकांना बी.एल. ओ / विशेष सखोल पुनरिक्षण ( एस आय आर ) बाबतची कामे सक्तीची करण्यात येऊ नये , दिव्यांग शिक्षक कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची फेर तपासणी करण्यात यावी , शिक्षकांच्या मुख्यालयाबाबतची अट शिथिल करण्यात यावी , शालेय पोषण आहाराची जबाबदारी मुख्याध्यापकांकडून काढून घेऊन सदर काम त्रयस्थ यंत्रणेकडे देण्यात यावे , जिल्हा परिषद प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत , शाळेत मुले – मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असावेत , शाळेत भौतिक सुविधा ( उदा – पंखा , लाईट तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ वॉटर फिल्टर ची सुविधा करण्यात यावी , शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक पारित करण्यात यावेत , शाळा डिजिटल करणे करिता ( उदा – टी. व्ही , कॉम्प्युटर , प्रिंटर , डिजिटल बोर्ड , इंटरनेट इत्यादी ) सुविधा देण्यात यावे , प्राथमिक / माध्यमिक शिक्षकांचे पगार दर महिन्याच्या पाच तारखेच्या आत करावेत.
वरील सर्व विषयांवर चर्चा करून विषय मार्गी लावू याबाबत प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अविनाश तांदळे यांना आश्वासन दिले असे एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे कळविण्यात आले आहे.



