ब्रेकिंग

मोठी बातमी | आर्यन आणि त्याच्या मित्रांनी ‘डार्कनेट’द्वारे दिले होते ड्रग्जसाठी दिले पैसे

 

मुंबई | ड्रग्स पार्टी प्रकरणी अटकेत असलेला शाहरूख खान याचा मूलगा आर्यन खान यांची आर्थरोड जेलमध्ये रवान्गी करण्यात आलेली असून या प्रकरणी राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच एनसीबे या प्रकरणी रोज नव-नवीन खुलासे करून एकच खळबळ माजवून देताना दिसून येत आहे.

त्यातच आता एनसीबी’ने आर्यन खान आणि त्याचा मित्रांवर गंभीर स्वरूपाचे आरोप लावले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार हे लोक ड्रग्जशी संबंधित व्यवहारासाठी डार्कनेट वापरत असल्याचं उघड झालं आहे. आर्यन खानने स्वतः हे पैसे दिले होते किंवा आरोपींपैकी कोणी हे केलं होतं, याबाबत एजन्सीने सध्या काहीही स्पष्टपणे सांगितलेलं नाही.

पीटीआय या वृत्तसंस्थेने एनसीबीच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटलं आहे की एजन्सीने आरोपींकडून हायड्रोपोनिक तण जप्त केले आहे, ज्याची संख्या आता २० आहे. ते डार्कनेटद्वारे खरेदी केले गेले आहेत. छाप्यांदरम्यान एनसीबीला काही आरोपींकडून एमडीएमए सापडले होते. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही ड्रग्ज बहुतांश युरोप आणि अमेरिकेतून आयात केलं जातं. एजन्सी आता हे ड्रग्ज आरोपींना कुठून मिळालं याची चौकशी करत आहे. हे ड्रग्ज मागवण्यासाठी डार्कनेटच्या माध्यमातून पैसे दिले जात होते हे मात्र सांगण्यात येत आहे.

Back to top button