मुंबई

चित्रा वाघ यांच्या टिकेला नवाब मलिकांनी दिलं प्रत्युत्तर, वाचा

 

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप लावून एकच खळबळ उडवून दिली होती. त्यातच या आरोपणानंतर भाजपा नेत्या चित्र वाघ यांनी या प्रकरणात उडी घेत थेट मंत्री नवाब मलिक यांचयव्हर निशाणा साधला होता भाजपच्या चित्रा वाघ यांनी समीर वानखेडे यांच्या खाजगी आयुष्यावर हल्ला केला जात असल्याचा आरोप नवाब मलिकांवर केला होता.

याला चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेला मंत्री नवाब मलिक यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे. “एखाद्याच्या खाजगी जीवनात जाण्याची आपली भूमिका नाही, एखादा व्यक्ती धर्मांतर करून दुहेरी लाभ घेत असेल, तर त्याचा उल्लेख केला पाहिजे सत्य समोर आणण्यासाठी काही गोष्टी बाहेर येत आहेत,” असं ट्विट करत नवाब मलिक यांनी चित्रा वाघ यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

तसेच ते पुढे म्हणतायत की, “एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आपण धर्म बदलला असून जन्माचा दाखला खोटा असल्याचा दावा केला असला, तर त्यांनी आपला खरा जन्माचा दाखला दाखवून सत्य समोर आणावं असा आव्हान त्यांनी समीर वानखडे यांना दिले आहे.

Back to top button