संपादकीय

इस्लाम हा धर्म नव्हे तर एक दहशतवादी गट; धर्मांतर करताना वसीम रिझवी यांचे वादग्रस्त विधान

 

नवी दिल्ली | सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी इस्लाम सोडून आज हिंदू धर्म स्वीकारला. गाझियाबादमधील डासना येथील देवीच्या मंदिरात नरसिंहानंद सरस्वती यांनी त्यांचा हिंदू धर्मात समावेश केला. हिंदू धर्मात प्रवेश करताच रिझवी यांनी इस्लाम धर्मावर सडकून टीका करत नवा वाद अंगावर ओढवून घेतला आहे इस्लाम हा धर्म नसुन दहशतवादी गट आहे अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला.

वसीम रिझवी म्हणाले, मोहम्मद साहेबांनी बनवेला इस्लाम धर्म वाचल्यानंतर आणि त्याचा दहशतवादी चेहरा पाहिल्यानंतर मला हे कळले. इस्लाम हा एखादा धर्म नाही तर एक दहशतवादी गट आहे, जो १४०० वर्षांपूर्वी अरबमध्ये तयार झाला होता. वसीम रिझवी यांच्या या विधानाने नव्या वादाला तोंड फुटू शकते.

दरम्यान आपण हिंदू धर्मच का स्वीकारला याबाबत विचारले असता ते म्हणाले, मला माझ्या धर्मातून काढण्यात आले. त्यामुळे पुढे कोणता धर्म स्वीकारायचा, ही माझी मर्जी आहे. सनातन धर्म हा जगातील सर्वत पहिला धर्म असून त्यात मानवतेशी निगडीत असंख्य चांगल्या गोष्टी आहेत म्हणून आपण हा धर्म स्वीकारला असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button