संपादकीय

जात नावाची कीड ! वाचा आणि विचार करा

जात ही आपल्या समाजाला लागलेली सर्वात मोठी कीड आहे.आज समाजात एखादे लहान मूल सुद्धा जन्माला आले की प्रथम त्याचे नाव नोंद होते ते जन्माचा दाखल्यावर पण गंमत अशी की त्याचं वेळेला एका विशिष्ट जाती मध्ये नाव नोंद करून त्याला त्या जातीचा टॅग लावला जातो. आणि खरच त्याला लहानपणा पासूनच स्व: जाती विषय प्रेम आणि इतर जाती विषय कडूपणा त्याचा मनात भरला जातो काही (अपवाद वगळता) असे मला वाटते.

पण आज माणूस फक्त जातीने ओळखला जातो का? त्याला त्याचा कर्तुत्वाने का ओळखले जात नाही मला याची खंत वाटते. आज माणुसकी पेक्षा आज जातीला जास्त महत्त्व आहे का? आज प्रत्येक शाळेत त्या त्या देवा जातीचा धार्मिक प्रार्थना बोलल्या जातात मग त्याला दुसऱ्या जाती विषय प्रेम कसे निर्माण होणार याचा विचार होणे महत्त्वाचे आहे.

आज समाजात जात महत्वाची आहे की लोकांची प्रगती पण हो यात जे जातीचे भांडणे लावतात त्यांची मुले कोणत्या ना कोणत्या प्रगती पथावर असतात इतके दिसून सुद्धा आपण शिक्षित अडाण्या सारखे का वागतो तर याला आपले सामाजिक वातावरण कारणीभूत आहे कारण या समाजात आपल्या डोळ्यावर जातीची काळी पट्टी लावलेली आहे त्यामुळे त्या पट्टीतून आपल्याला आपले आणि परके असे दोन्ही दिसतात.

परंतु आज आपण या जात नावाचा रोगाचा वेळीच उपाय करणे महत्त्वाचे आहे कारण ही जात धड आपली प्रगती कधीच होऊन देणार नाही. आज माणसाने आपल्या मूलभूत गरजा कडे पाहणे हे मला जास्त महत्वाचे वाटते कारण जात माणसाच पोट भरत नाही उलट त्याला प्रगती करण्या पासून रोखते असे मला वाटते.
आपला सुरज

Back to top button