मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ क्रिकेटपटूंना साद

 

मुंबई | ठाकरे कुटुंबीय आणि दिग्गज क्षेत्रातील खेळाडू यांच्यातील नातं जगजाहीर आहे. यापूर्वी अनेक क्रिकेटर शिवसेना प्रमुख बाबासाहेब ठोकरे यांची भेट घेण्यसाठी मातोश्रीवर येतंच होते हेच संबंध शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा जपले आहेत.त्यातच माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्या टेस्ट पदार्पणाला 50 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून वानखेडे स्टेडियम येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत सुनील गावसकर हॉस्पिटॅलिटी बॉक्स आणि दिलीप वेंगसरकर स्टँडचे नामकरण करण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनी केलेले विश्वविक्रम हे देशातल्याच क्रिकेटरकडूनच मोडले जायला हवेत, अशी पिढी घडवा. माझा देश सर्व क्षेत्रात उत्तम असायलाच पाहिजे. तो क्रिकेटच्या बाबतीत उत्तम होण्यासाठी जे काही करणं आवश्यक आहे ते केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले की, वानखेडे स्टेडियमच्या स्टॅण्ड तसेच अन्य भागांमध्ये आज जी नावे दिसत आहेत. ती नावे केवळ स्पॉन्सरर मिळाला म्हणून येत नाहीत तर ही नावे यायला कर्तृत्व गाजवायला लागते. शतके ठोकावी लागतात, उत्तम कामगिरी करावी लागते. गावसकर, तेंडुलकर क्रिकेटची अॅकेडमी सुरू करीत आहेत. तेव्हा स्वतःपुरते खेळणे हा भाग वेगळा, पण तुमचा अनुभव देशाला भविष्यात उपयोगी पडायला हवा. एकामागोमाग एक तुम्ही जे विश्वविक्रम केले आहेत ते सर्व विश्वविक्रम माझ्या देशातल्याच क्रिकेटरकडून मोडले जायला हवेत.

यावेळी सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर यांच्यासह महापौर किशोरी पेडणेकर, सचिन तेंडुलकर, गुंडाप्पा विश्वनाथ, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, उपाध्यक्ष अमोल काळे, सचिव संजय नाईक, सहसचिव शाहआलम शेख, खजिनदार जगदीश आचरेकर,
टी-20 गव्हार्ंनग काऊन्सिलचे चेअरमन मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.

Back to top button