📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

बीड शहरातील मोकाट कुत्र्यांचा न. प. ने त्वरित बंदोबस्त करावा – सोमेश कदम

बीड शहरातील मोकाट कुत्र्यांचा न. प. ने त्वरित बंदोबस्त करावा – सोमेश कदम
बीड (प्रतिनिधी):-बीड शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत असून शाळेत जाणारी मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच रात्री प्रवास करणारे नागरिक असुरक्षित झाले आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठा, वसाहती आणि सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेषतः सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलींना आणि महिलांना या कुत्र्यांमुळे त्रास सहन करावा लागत असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले आहे. काही भागात तर कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना समोर आल्याने चिंतेत भर पडली आहे.
या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने त्वरित भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सोमेश कदम यांनी नगरपरिषदेला लेखी निवेदनाद्वारे केली आहे.कदम यांनी सांगितले की, “शहराचा विस्तार वाढला असला तरी मूलभूत सुविधा आणि नागरी सुरक्षेकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कुत्र्यांचा बंदोबस्त करणे अत्यावश्यक आहे.”नागरिकांकडूनही प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.
Back to top button