बीड

अनिलदादा जगताप फाउंडेशनकडून मंजेरी हवेली शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप!

अनिलदादा जगताप फाउंडेशनकडून मंजेरी हवेली शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप!

बीड, प्रतिनिधी-  शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांच्या समाज कार्याला प्रभावित होऊन बीडमधील असंख्य तरुणांनी एकत्रित येऊन समाजसेवेचे कार्य करण्यासाठी अनिलदादा जगताप फाउंडेशनची स्थापना केली. या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात दिला जातो. याबरोबरच समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. अनिलदादा जगताप फाउंडेशनचे सचिव आकाश भैय्या जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पाली सर्कलमधील जिल्हा परिषद शाळा (मंजेरी हवेली) येथील विद्यार्थ्यांना दि. 21 मार्च 2025 रोजी अनिलदादा जगताप फाउंडेशनच्या वतीने वह्या वाटप करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तथा पालकांच्या उपस्थितीमध्ये अनिलदादा जगताप फाउंडेशनचे कार्यवाहक प्रतिक कांबळे यांनी या वह्या वाटप केल्या. जिल्हा परिषद शाळा मंजेरी हवेलीचे मुख्याध्यापक सय्यद सर आणि उपस्थित पालकांनी यांनी अनिलदादा जगताप फाउंडेशनचे आभार व्यक्त करत फाउंडेशनच्या समाजसेवेच्या कार्याचे कौतुक केले आणि अनिलदादा जगताप फाउंडेशनच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
°°°°°
Back to top button