राजकीय

महागडे कपडे आणि घड्याळांच्या आरोपावर समीर वानखेडे यांची पहिली प्रतिक्रिया

 

क्रूझ ड्रग्ज पार्टीवर छापा अभिनेता शाहरुख खान यांच्या मुलाला अटक केल्यामुळे चर्चेत आलेले एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सातत्यानं आरोप करत आहेत. समीर वानखेडे परिधान करत असलेले कपडे आणि घड्याळांची किंमत ५ ते १० कोटींच्या घरात आहे असा खळबळजनक आरोप आज मलिक यांनी केला. त्यावर आता समीर वानखेडे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

“माझ्या महागड्या कपड्यांची केवळ अफवा आहे. मलिक यांनी लोखंडवाला मार्केटमध्ये जावं आणि तिथं कपड्यांचे दर माहिती करुन घ्यावेत. त्यांनी खरी माहिती शोधून काढावी”, असा टोला समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांना लगावला आहे. यासोबतच एका ड्रग पेडलकरनं आपल्या कुटुंबाला फसवण्याचा प्रयत्न केला होता असा गौप्यस्फोट देखील वानखेडे यांनी यावेळी केला आहे.

वानखेडे म्हणाली की, सलमान नावाच्या एका ड्रग पेडलरनं माझ्या बहिणीशी संपर्क साधला होता. पण माझ्या बहिणीनं वेळीच त्याची केस घेण्यास नकार दिला होता. एनडीपीएस प्रकरणं मी हाताळत नाही असं तिनं त्यावेळी सांगितलं होतं आणि त्याला पळवून लावलं होतं. याच व्यक्तीच्या माध्यमातून माझ्यासह माझ्या कुटुंबाला ट्रॅपमध्ये अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानं एका खोट्या तक्रारीसह मुंबई पोलिसात धाव घेतली होती. पण त्यातून पुढे काहीच झालं नाही असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

Back to top button