राजकीय

नाशिकमध्ये भाजपचेच नगरसेवक संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मेळाव्याला हजर

 

नाशिक महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना स्थानिक ववतारां चांगलेच तापले असून सर्वच राजिक्य पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तसेच दुसरीकडे शिवसेना पक्षाने सुद्धा जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच नाशिक महापालिका निवडणुकीच्यापार्श्वभूमीवर आयोजित शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला.

मात्र या मेळाव्यात भारतीय जनता पक्षाचे 3 ते 4 भाजपचे नगरसेवक उपस्थितीत असल्याची बाब समोर आली आहे. एवढंच नाहीतर भाजपच्या नगरसेवकांनी संजय राऊत यांचा सत्कार केला आहे. त्यामुळे नाशकात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर आहे. तसेच अनेक पदाधिकार्यांच्या भेटी सुद्धा घेताना दिसत आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत पदाधिकारी, लोकप्रतिनिधी संवाद मेळावा पार पडला. यावेळी संजय राऊत यांची चौफेर तोफ धडाडली. यावेळी भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या ३ ते ४ विद्यमान नगरसेवकांनी हजेरी लावली होती.

Back to top button