औरंगाबाद

सरकारी परिपत्रकात औरंगाबादचं संभाजीनगर होताच इम्तियाज जलील भडकले

 

श्विवसेना पक्ष सत्तेत नसल्यापासून औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करताना दिसून आले आहेत. त्यातच याच मुद्दयावरून औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीला शिवसेना सामोरी गेली आहे. त्यातच आता राज्य शासनाच्या एका परिपत्रकात औरंगाबाद शहराचा उल्लेख औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असा करण्यात आलाय. या उल्लेखानंतर एमआयएम पक्षाचे नेते तथा खासदार इम्तियाज जलील चांगलेच भडकले आहेत.

या परिपत्रकामुळे खासदार जलील यांनी थेट ठाकरे सरकारला आव्हान दिले आहे.त्यांनी हिंमत असेल तर शहराचे नाव बदलून दाखवा असं थेट आव्हान दिलं आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढलं त्याने राजीनामा द्यावा अशी मागणी जलील यांनी केली आहे. या मुद्द्यावरून आता औरंगाबादेतील वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद शहराच्या नावावरुन मागील कित्येक वर्षांपासून शिवसेना तसेच भाजपसारखे हिंदुत्ववादी पक्ष औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करतात. तर काँग्रेससारख्या पक्षाने औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याला विरोध केलेला आहे. फक्त शहराचे नाव बदलण्यापेक्षा पायाभूत सुविधांचा विकास व्हावा अशी भूमिका काँग्रेससारख्या पक्षांनी घेतलेली आहे.

त्यातच एका परिपत्रकात औरंगाबाद शहराचा उल्लेख थेट संभाजीनगर अस करण्यात आलाय. मात्र हा प्रकार उघडकीस आल्यानंतर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक पवित्रा धरण केला आहे. जलील यांनी हिंमत असेल तर शहराचं नाव बदलून दाखवा, असं म्हणत थेट आव्हान दिलं आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढलं त्याने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीदेखील इम्तियाज जलील यांनी केली आहे.

Back to top button