चैत्यभूमीबाहेर ऑल इंडिया पँथरच्या कार्याकर्त्यांचा गोंधळ

मुंबई | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी, शिवाजी पार्क येथे येत असतात. मात्र यावेळी कोरोनाच्या संसार्गाचे नियम पळून अबिवादन करण्याचे आव्हान मनपाकडून करण्यात आले होते.
मात्र, मुंबईतील चैत्यभूमीवर काही वेळेसाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांना पोलिसांनी रोखल्यानं काही अनुयायी संतापले. या अनुयायांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. ऑल इंडिया पँथरचे कार्यकर्त्यांनी चैत्यभूमीच्या बाहेर गोंधळ घातला. एकीकडे राजकर्त्यांनी दर्शनासाठी सोडत असताना आम्हाला बंधने का असा सवाल अनुयायी विचारत होते.
राजकीय नेते थेट येऊन दर्शन घेतायेत तर त्यासोबत त्यांचे अनेक कार्यकर्ते देखील त्यापद्धतीत दर्शन घेतात. मग सामान्य माणसाने का रांगेत येऊन दर्शन घ्यावे या निषेधार्थ काही तरुणांनी बॅरिकेट्स तोडून आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला. हे तरुण केवळ स्टंटबाजी करत असल्याचं आयोजन