संपादकीय

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टानिर्माण झाल्यामुळं राज्यातील ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता !

 

मागच्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यातच महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. पुण्यात रविवारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली होती. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील काही विविध भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच सिंधूदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्यास सुरूवातही झाली आहे. पुढचे चार ते पाच दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या उस उत्पादक शेतकऱ्यांचंही यामुळे नुकसान होणार आहे.

ऐन हिवाळ्यात थंडी ऐवजी पावसाने हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आता सध्या राज्यातील वातावरण पुढील २४ तासांसाठी असंच राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याचबरोबर समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणात हे होणारे अनपेक्षित बदल नागरिकांच्या चिंतेत भर पाडत आहेत. तसेच मच्छीमारांनाही हवामान विभागाने २ दिवस मच्छीमारीसाठी अरबी समुद्रात न जाण्याचं आवाहन केलं आहे.

Back to top button