बीड

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने संस्थेतंर्गत शिक्षकांच्या परीक्षा घेण्याचा घातला घाट !

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने संस्थेतंर्गत शिक्षकांच्या परीक्षा घेण्याचा घातला घाट !
मराठवाडा शिक्षक संघाचा नियमबाह्य व बेकायदेशीर परीक्षा घेण्याला कडाडून विरोध
 शिक्षकांचा परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा व आंदोलन करण्याचा निर्णय
बीड / प्रतिनिधी:-मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या शिक्षकांच्या परीक्षा नियमबाह्य तसेच शिक्षकांना वेठीस धरण्यासाठी आयोजित करण्यात आल्या आहेत. या परीक्षेस शिक्षकांचा विरोध असल्याने या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव व सरचिटणीस राजकुमार कदम यांनी शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्र कार्यकारिणी जिल्हा सचिव गणेश आजबे यांनी याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने शनिवार (दि.12) मार्च 2025 रोजी संस्थेअंतर्गत अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या अनुभवी शिक्षकांची 100 गुणांची परीक्षा आयोजित केलेली असून, ही परीक्षा म्हणजेच शिक्षकांचा करण्यात येणारा अवमान असून होत असलेली ही परीक्षा शिक्षकांच्या व्यावसायिक प्रतिष्ठेच्या विरोधात आहे. तसेच हा कायद्याचा आणि नियमाचा भंग आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातील शिक्षक कर्मचाऱ्यांनी या परीक्षा घेण्याला विरोध दर्शविला आसून याकामी मराठवाडा शिक्षक संघटनेकडे धाव घेतली आहे.
हा अपमान शिक्षक कर्मचारी कदापिही सहन करणार नाही तरी ही परीक्षा मंडळाने न घेता शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी संस्था अंतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन करावे जेणेकरून शिक्षकांच्या गुणवत्तेमध्ये निश्चितच वाढ होईल.असी मराठवाडा शिक्षक संघाची भूमिका आहे. परंतु मंडळाने नियमबाह्य बेकायदेशीर या परीक्षांचे आयोजन करून शिक्षकांना मानसिक त्रास व शिक्षकांच्या आत्मसन्मानावर आघात करण्याचे कार्य केलेले आहे तरी या परीक्षा तात्काळ रद्द करण्यात याव्यात अन्यथा लोकशाही मार्गाने परीक्षेवर बहिष्कार टाकून आपल्या संस्थेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिक्षण प्रसारक मंडळातील शिक्षक कर्मचाऱ्यासह मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव,सरचिटणीस राजकुमार कदम, उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे, गुठ्ठे एस.जी.,कोषाध्यक्ष औताडे ए.बी.,माजी जिल्हाध्यक्ष डी.जी.तांदळे, जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे, जिल्हा सचिव गणेश आजबे , केंद्र कार्यकारिणी सदस्य बंडू आघाव, अशोक मस्कले, नामदेव काळे, सुभाष शेवाळे, विजय गणगे, परवेज देशमुख, व्यंकटराव धायगुडे, हनुमंत घाडगे, गोवर्धन सानप, मनोज सातपुते, तावरे डी. एम, दिनकर शिंदे, युवराज मुरूमकर, विनोद सवासे, अनुप कुसुमकर, श्रीधर गुट्टे, सुमंत गायकवाड, विष्णू वळेकर, प्रदीप चव्हाण, हेमंत धानोरकर, शेख आय. जे, एम.डी. डोळे, अशोक अशोक गाडेकर,  शिवाजी ढोबळे, जीवनराव थोरात, बाळासाहेब टिंगरे, दादासाहेब घुमरे, बाळासाहेब काळुशे, शामसुंदर साळुंके, सुनिल जाधव, श्रीनिवास काकडे,  हनुमंत गवारे, तुळशीदास सोळंके, जगदिश्चंद्र प्रेमचंद तोष्णीवाल, नदीम युसूफ, पुरुषोत्तम येडे पाटील, संजय गोरे, अलिशान काझी, सुनिल नागरगोजे, बी. टी. खाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
Back to top button