बीड
सज्जन दुर्जन असा भेद न करता माऊलीं दादानी सगळ्यांवर कृपा केली

सज्जन दुर्जन असा भेद न करता
माऊलीं दादानी सगळ्यांवर कृपा केली
………………………… …………
ह.भ.प. श्री राम महाराज काजळे
………………………… ………..
बीड ( प्रतिनिधी) श्री.माऊली महाराज दादा म्हणजे सज्जन दुर्जन, गरीब श्रीमंत शिक्षित अशिक्षित लहान मोठाअसा
कसलाच फरक न करता आईप्रमाणे सर्वांनाच कृपा आशीर्वाद देणारी वासल्य मूर्ती होते त्यांनी जगताच्या उद्धारासाठीच संपूर्ण जीवन वेचले असे विचार
ह भ प मृदंग महामेरू श्रीराम महाराज काजळे यांनी व्यक्त केले.
श्री माऊली महाराज यांच्या 26 व्या पुण्यस्मरण सोहळ्यात ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ अधिकारी प्रमुख म्हणून अनेक वर्षापासून त्यांनी सेवा सांभाळली असून पारायण दरम्यान ओव्यांचा संदर्भात थोडक्यात चिंतन मांडताना ते बोलत होते.
माऊलींनी आलेल्या प्रत्येक माणसांच्या पत्रात आनंद समाधान आणि आशीर्वादाचे दान दिले सदैव नामस्मरण आणि अखंड अन्नदान हे तत्व संपूर्ण आयुष्य पाळणे लाखो करोड भाविकांचा त्यांनी मार्ग दाखवून उद्धार केला सन्मार्गाला लावले असे सांगून आज सलग 26 वर्षे आपले गाव घरदार सोडून माऊलींच्या या पुण्यतिथी सोहळ्यात पारायण व आपल्या हातून घडील ती सेवा करण्यासाठी
चाकरवाडी आवर्जून मुक्कामी राहतात माऊली हा त्यांचा ध्यास आणि माऊली हाच त्यांचा देव अशी भावना या माऊली भक्तांची असल्याचे श्री काजळे महाराज यांनी सांगितले व जो तुमच्या वर नितांत श्रद्धा भक्ती भाव ठेऊन त्यांच्या सांगितलेल्या वचनावर चालला त्याचा तर उद्धार झालाच पण जे चालू शकले नाहीत त्यांनाही माऊलीने तारले असल्याचे काजळे महाराज यांनी स्पष्ट केली आज त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून श्री महादेव महाराज तात्या व श्री नारायण महाराज भाऊ हा माऊलींचा भक्तीचा मळा अधिक जोमाने फूलविण्यासाठी व लोकांच्या कल्याणासाठी अहरनिश परिश्रम घेत असल्याचे सांगितले.



