संपादकीय

आजचा दिवस हा शेतकऱ्यासाठी आनंदाचा नसून काळा दिवस

 

आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत मोठी घोषणा केली आहे. प्रयत्न करूनही आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकर्‍यांचाच एक वर्ग त्याला विरोध करत होता, पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयानंतर सदाभाऊ खोत यांनी तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजचा दिवस काळा दिवस आहे. असे म्हणावे लागेल. कारण शेतकऱ्यांना जे या कायद्याने स्वातंत्र्य मिळणार होते ते हिरावून घेतले गेले आहे. मूठभर दलाल आडती यांचा विजय झाला आहे असं म्हणत थेट या निर्णयाविरोधात भाष्य केले आहे.

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज खऱ्या अर्थाने शेतकरी जिंकला असे बोलले जात आहे. मात्र, तो हरला आहे. आज आडत व्यापारी, दलाल जिंकले आहे. पंतप्रधानांच्या निर्णयामुळे शेतकरी हारला आहे. त्याचा पराभव झाला आहे. पंजाब हरियाणा, उत्तर प्रदेश शेतकरी मार्केट कमिटी भोवती बाजारपेठ फिरत असते, त्यांच्या टक्केवारी मिळते.

शेती क्षेत्रात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला जात आहे. त्यात आडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असून आता संधी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱयांनी जल्लोष साजरा करताना विचार करावा, असे शेतकरी नेते खोत यांनी म्हंटले आहे.

Back to top button