संपादकीय

उशिरा का होईना, कृषी कायद्याच्या निर्णयानंतर शरद पवारांचा मोदी सरकारला टोला !

 

मुंबई | आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत मोठी घोषणा केली आहे. प्रयत्न करूनही आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकर्‍यांचाच एक वर्ग त्याला विरोध करत होता, पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्या निर्याणानंतर रास्तवराडीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी केंद्रातील मोदी सरकारला टोला हाणला आहे.

केंद्रातील मोदी सरकारने आणलेले तीन कायदे कृषी अर्थव्यवस्थेला अडचणीत आणणारे होते. त्यामुळेच शेतकऱ्यांनी त्यांना विरोध केला. त्यामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, हरयाणातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यात फटका बसून नये म्हणून कायदे रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारकडून घेण्यात आला, असं पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.

हजारो शेतकरी गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. थंडी, वारा, ऊन, पावसाची तमा न बाळगता शांततेच्या मार्गानं त्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल अखेर सरकारला घ्यावी लागली. या शेतकऱ्यांच्या लढ्याला, त्यांच्या संघर्षाला मी सलाम करतो, असं म्हणत पवारांनी शेतकरी आंदोलकांचं कौतुक केलं.

Back to top button