📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

वैभव वराट यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड ..

वैभव वराट यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड ..

स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड यांच्यावतीने सन्मान..

जामखेड-   जामखेड येथील स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड येथे वैभव वराट यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल शाल, पुस्तक व गुलाब पुष्प देऊन उपक्रमशील शिक्षक शिंदे बी.एस. यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी वैभव वराट यांनी आपले शालेय शिक्षण व आपले शालेय अनुभव कथन केले. स्पर्धा परीक्षा तयारी करताना सातत्य, परिश्रम, वेळेचे नियोजन याबद्दल अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याना सखोल मार्गदर्शन केले.स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्याचा कानमंत्र विद्यार्थ्याना दिला.यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड मध्ये मिळत असलेले शांत व प्रसन्न  वातावरणातील अभ्यासिका वर्तमानपत्रे, मासिके, नोट्स, स्पर्धा परीक्षा पुस्तके आणि मार्गदर्शन या सुविधा बद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.

प्रमूख पाहुणे श्री दत्ता मुरूमकर सर यांनी अभ्यासिकेतील यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे या बद्दल आनंद व्यक्त केला.

वैभव वराट यांचे मामा सूर्यकांत ढवळे सर यांनी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी चौरस अभ्यास करावा.व आपले पाय नेहमी जमिनीवर ठेवण्याचा अनमोल सल्ला दिला.

यावेळी श्री नागेश विद्यालय जामखेड मधिल दत्तात्रय मुरूमकर सर,जिल्हा परिषद आदर्श शिक्षक श्री सूर्यकांत ढवळे सर व स्वामी विवेकानंद अभ्यासिकेतिल विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत संचालक प्रियंका शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन आजिनाथ हळनोर यांनी पार पाडले.व उपस्थित सर्वांचे आभार खाडे प्रतिक्षा यांनी मानले.

Back to top button