संपादकीय

“मोदी सरकारवर विश्वास कसा ठेवायचा, अध्यादेश का काढला नाही?”

 

आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत मोठी घोषणा केली आहे. प्रयत्न करूनही आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकर्‍यांचाच एक वर्ग त्याला विरोध करत होता, पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी घणाघाती टीका केली आहे.

शेतकऱ्यांना अटक केली जात होती. त्यांची हत्या केली जात होती. मारहाण केली जात होती. तुमचेच सरकार हा अन्याय करत होते. आता मात्र तुम्ही म्हणता कायदे मागे घेतो. मग तुमच्यावर आम्ही विश्वास कसा विश्वास ठेवायचा, तुमच्या नियतीवर विश्वास कसा ठेवायचा, मोदी सरकार यासंदर्भात अध्यादेश काढणार का, अशी विचारणा प्रियंका गांधी यांनी केली.

शेतकऱ्यांपेक्षा कोणी मोठे नाही, हे उशिरा का होईना पण सरकारला कळले आहे. शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी उभे ठाकतात आणि सत्ताधाऱ्यांना झुकावेच लागते हे सरकारला कळले आहे. याचा आनंद आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक एकवटले याचाही आनंद आहे, असे प्रियंका गांधी यांनी यावेळी नमूद केले.

पंतप्रधान मोदी एकदाही बॉर्डवर गेले नाहीत. शेतकऱ्यांना भेटले नाहीत. हिंसा झाली, हत्या झाली त्या ठिकाणीही ते कधी गेले नाही. त्यांनी कधी शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेतल्या नाहीत. मग आज अचानक त्यांना कशी काय जाग आली? निवडणुका येत असल्यामुळेच हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट आहे, असे सांगत प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी अध्यादेश काढता. मग कृषी कायदे रद्द करणारा अध्यादेश का काढला नाही. निवडणुका आल्यावरच अध्यादेश काढणार आहात का, केवळ निवडणुकीसाठी निर्णय घेणार आहात का, अशी प्रश्नांची सरबत्ती प्रियंका गांधी यांनी यावेळी केली.

Back to top button