बीड
शेतकरी हक्क मोर्चासाठी वर्गणी करून येण्याचा वांगीकरांचा निर्धार

शेतकरी हक्क मोर्चासाठी वर्गणी करून येण्याचा वांगीकरांचा निर्धार
शेतकरी पुत्रांच्या गावागावात बैठकीस सुरुवात
बीड (प्रतिनिधी):कापूस व सोयाबीनला रास्त भाव मिळावा, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य **“शेतकरी हक्क मोर्चा”**साठी गावागावात जनजागृती सुरू झाली आहे. हा मोर्चा दि. २५ डिसेंबर (गुरुवार) रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान काढण्यात येणार आहे.
या मोर्चात जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग व्हावा, यासाठी दि. १४ डिसेंबर (रविवार) रोजी वांगी गावात शेतकऱ्यांची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत वांगी गावातील शेतकरी, शेतकरी पुत्र व शेतकरी मित्रांनी लोकवर्गणी जमा करून बीड येथे मोर्चात सहभागी होण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
बैठकीत कापसाला १२ हजार रुपये, सोयाबीनला ७ हजार रुपये व तुरीला १२ हजार रुपये किमान हमीभाव मिळावा,
सीसीआयकडून होणारी शेतकऱ्यांची अडवणूक तात्काळ थांबवावी,
हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,
तसेच परदेशातून कापूस व सोयाबीन आयातीवर बंदी घालावी,
या प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शेतकरी हक्क मोर्चाच्या जागृतीसाठी शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे, माजी सैनिक अशोक येडे, शेतकरी नेते गणेश नाईकवाडे, राजू गायके, सुहास जायभाये, अर्जुन सोनवणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
या वेळी वांगी गावातील रतन शेळके, प्रकाश हाडूळे, रामहरी हाडूळे, जीवन शेळके, दिनकर शेळके, महादेव शेळके, बालाभाऊ शेळके, बाळू हाडूळे, ज्ञानेश्वर हाडूळे, गोरख बोनुगुडे, हरभाऊ शेळके, रतन बाजगुडे, तुकाराम शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, शेतकरी पुत्र व शेती मित्र उपस्थित होते.



