संपादकीय

कृषी कायदा रद्द | हा शेतकरी एकजुटीचा,सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय

 

मुंबई | आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत मोठी घोषणा केली आहे. प्रयत्न करूनही आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकर्‍यांचाच एक वर्ग त्याला विरोध करत होता, पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्या निर्याणानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटेनचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाष्य केले आहे.

‘दीर्घ काळापासून हे आंदोलन सुरु होतं. येत्या २५ तारखेला या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होणार होतं. अखेर सत्याचा विजय झाला. ज्या पद्धतीने आम्ही लोकशाही मार्गाने हे आंदोलन पुढे रेटलेलं होतं, शेतकरी घर दार सोडून सत्याग्रह करत होते, या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. या आंदोलनात हिंसक घटना घडवण्याचा प्रयत्न झाला. तरीही शेतकरी आपल्या मुद्यावर ठाम राहिले’, असे शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

‘हा शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय आहे. पंतप्रधानांनी उशिरा का होईना हा निर्णय जाहीर केला, मी त्याचं स्वागत करतो. शेवटी देश सर्वांना सोबत घेऊन चालवायचा आहे. समाजातील कोणीही एक घटक नाराज राहिला तर समाजात अस्थिरता निर्माण होते. त्यामुळे मी या निर्णयाचं स्वागत करतो’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Back to top button