📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

सोमवारी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज मस्के  यांची प्रवचन सेवा

सोमवारी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज मस्के  यांची प्रवचन सेवा
बीड प्रतिनिधी:-बीड शहरातील बार्शी रोड वरील स्वराज्य नगर येथील रहिवाशी व बीड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक   ह.भ.प.  माधव महाराज डाके यांच्या माऊली निवास्थानी प्रतीवर्षा प्रमाणे यावर्षी ही चातुर्मास उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे, आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी या चार महिन्यांच्या पवित्र पर्वकाळात प्रती सोमवारी रात्री 8 ते 9 यावेळेत विविध ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रेमी महाराज मंडळींची श्री ज्ञानेश्वरी  प्रवचन सेवा संपन्न होत आहे.
या चातुर्मास उत्सवा निम्मित सोमवार दिनांक २५/८/२५ रोजी रात्री ८ते९ या वेळेत  ह भ प ज्ञानेश्वर महाराज मस्के  यांची  प्रवचन सेवा होणार आहे. सदरील प्रवचन सेवेचे थेट प्रक्षेपण माधव महाराज डाके काठवडेकर या फेसबुक अकाऊंट वरून होणारअसून,
या चातुर्मास उत्सवात आपण सर्वांनी सहभागी होऊन श्री  ज्ञानेश्वरी प्रवचन श्रवणनाच लाभ घ्यावा असे आवाहन ह भ प माधव महाराज डाके यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे….
Back to top button