विद्यार्थिनींनी उच्च शिक्षण घेऊन कुटुंब व समाजाचा नावलौकिक वाढवावा – सुरेश भोसले

विद्यार्थिनींनी उच्च शिक्षण घेऊन कुटुंब व समाजाचा नावलौकिक वाढवावा – सुरेश भोसले
कन्या विद्यालय येथे एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थिनींचा गौरव सोहळा संपन्न
जामखेड प्रतिनिधी (ता. २६ एप्रिल) :शिक्षणाबरोबरच संस्कारांचे महत्त्वाचे आहे.कर्मवीर भाऊराव पाटीलांनी बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याशी सुसंवाद साधला पाहिजे.सध्या माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे.मोबाईलचा योग्य वापर करावा आणि विद्यार्थिनींनी उच्च शिक्षण घेऊन समाजाचा गौरव वाढवून आपल्या कुटुंबाचे व समाजाचे नावलौकिक करावा.असे गौरवोद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य जेष्ठ नेते सुरेश भोसले यांनी काढले.
रयत शिक्षण संस्थेचे कन्या विद्यालयात एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य जेष्ठ नेते सुरेश भोसले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड केंद्राचे केंद्रप्रमुख नवनाथ बडे होते.
यावेळी जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात,प्रकाश सदाफुले, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष कुंडल राळेभात, शाळा व्यवस्थापन व विकास समितीच्या सदस्या प्रा.विद्या वाव्हळ,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम. रोहिणी भोर,पर्यवेक्षक संजय हजारे ,गुरुकुल विभाग प्रमुख बाबासाहेब आंधळे ,गुणवत्ता कक्ष विभागप्रमुख श्रीम.अर्चना शिंदे ,सुनील वारे.मोहन यादव,गडगुले बी.ए ,घोडके ए.एन ,ठाकरे एस.बी श्रीम.ससाणे व्ही. एस.,श्रीम. साळुंखे एम.बी. श्रीम.मुसळे आर आर श्रीम.लोंढे एस.ए.सौ.गायकवाड बी.डी श्रीम.साठे एस आर. श्री.पवार विलास श्री डोईफोडे एस.एस.श्री.ठोंबरे आर.यु.श्री जाधव जी.के इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना प्रा.मधुकर राळेभात म्हणाले की,”शाळा म्हणजे एक कुटुंब आहे, समन्वयातूनच प्रगती साधता येते, विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने बाळगावी.
केंद्रप्रमुख नवनाथ बडे यांनी स्पर्धा परीक्षांचे महत्त्व, शालेय जीवनातील शिस्त, स्वच्छता व गुणवत्ता यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती रोहिणी भोर यांनी केले. सूत्रसंचालन संतोष सरसमकर व शंभुदेव बडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशांत पोकळे यांनी मानले.



