बीड
बहुजन समाज पार्टी जिल्हा युनिटची नॉांदेड येथे आज महत्वाची बैठक !

बहुजन समाज पार्टी जिल्हा युनिटची
नॉांदेड येथे आज महत्वाची बैठक !
नांदेड (प्रतिनिधी) : बहुजन समाज पार्टी नांदेड जिल्हा युनिटची महत्वाची बैठक येत्या शुक्रवार दिनांक २५/०९/२०२६ रोजी दुपारी १२.०० वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे.
सदर बैठकीत मुंबई येथे पार पडलेल्या मासिक बैठकीचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन मराठवाडा झोन तर्फे दि.९/१०/२०२६ रोजी नांदेड येथे करण्याचे ठरले आहे, तसेच राष्ट्रीय अध्यक्षा बहुजन समाज पार्टी तथा माजी मुख्यमंत्री उत्तर प्रदेश बहन कुमारी मायावतीजी यांचा १५ जानेवारी २०२७ रोजीचा वाढदिवस “आर्थिक सहयोग दिवस” म्हणून साजरा करायचा आहे. यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
सदर बैठक जिल्हाध्यक्ष सुभाष भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या बैठकीस महाराष्ट्र सचिव तथा मराठवाडा झोन प्रभारी मनिषभाऊ कावळे हे मार्गदर्शन करणार आहेत तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.
तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व जिल्हा प्रभारी, महिला जिल्हाध्यक्ष व महिला आघाडी, विधानसभा पदाधिकारी व सर्व नऊ विधान सभेतील सर्व विधानसभा प्रभारी, विधानसभा अध्यक्ष व विधानसभा पदाधिकारी यांनी या बैठकीला उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे कळविण्यात आले आहे.


