बीड

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त संगीत विभागाच्या वतीने जुन्या सदाबहार चित्रपट गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त संगीत विभागाच्या वतीने जुन्या सदाबहार चित्रपट गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न
बीड (प्रतिनिधी) ः येथील सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व संगीत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माजी नगराध्यक्ष तथा नवगण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्या सदाबहार चित्रपट गीत गायनाचा कार्यक्रम दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर हे होते. यावेळी महाविद्यालयातील उपप्राचार्य  डॉ. अनिता शिंदे व प्रा. सुरेश थोरात यांनी एकत्रितपणे तुम से मिलके हे गीत गायले तर प्रा. जमदाडे दिपक यांनी  पल पल दिल के पास हे गीत गायले. प्रा. पवन शिंदे यांनी ये जिंदगी गले लगाले हे गीत सादर केले. डॉ. श्रीमंत तोंडे  व डॉ. अनिता शिंदे यांनी मराठी चित्रपटातील चोरीचा मामला मामा ही थांबाला ही प्रसिध्द गीत गायले. डॉ. चौधरी व्ही. एम. यांनी तुझ से नाराज नहीं जींदगी हे गीत गायले.  डॉ. शंकर राऊत यांनी तुम संग प्रित लगाई सजना हे गीत गायले. तसेच महाविद्यालयाची  विद्यार्थीनी कु. श्रेया सरकटे हिने शारद सुंदर चंदेरी राती हे गीत गायले तसेच कैवल्य सुरवसे याने गुलाबी आँखे व मेरे सपनों की रानी हे गीत गाऊन उपस्थितानां मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे यांची  प्रमुख उपस्थिती होती. यावेळी  पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. खान ए.एस. , कमवि उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे, पर्यवेक्षक श्री. जालिंदर कोळेकर उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार डॉ. दुष्यंता रामटेके यांनी केले. याकार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
Back to top button