विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारसरणी आणि तर्कशुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो – विनोद कळेकर
नेकनूर येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळेत विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते त्याचे उद्घाटन शिक्षणप्रेमी विनोद कळेकर यांच्या हस्ते करण्यात आले . विज्ञानाविषयी आवड निर्माण करणे आणि भविष्यातील शास्त्रज्ञ घडवण्यासाठी पायाभरणी करणे , नवीन कल्पनाशोध आणि प्रकल्पांना व्यासपीठ देऊन विद्यार्थ्यांना संशोधक बनण्यास प्रोत्साहन देणे, शाळेतील विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला योग्य व्यासपीठ देऊन त्यांच्यातील सुप्त गुण (Skills) बाहेर आणणे या उद्देशाने शाळेत विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते यामध्ये जवळ जवळ 40 विद्यार्थिनी सहभाग घेतला होता शिक्षकांनी मार्गदर्शन करून वेगेवगेळे प्रयोग मुलांना सांगितले त्या प्रमाणे मुलांनी खूप छान छान प्रयोग करून दाखविले प्रदर्शन हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना भविष्यातील वैज्ञानिक आव्हानांसाठी तयार करण्यासाठी खूप महत्वाचे आहे असे प्रतिपादन प्रदर्शनाचे उद्घाटक श्री विनोद कळेकर यांनी केले