बीडब्रेकिंग

एक महिन्यापासुन परळी शहरातील वर्दळीचा रस्त्याचे काम ठप्प!


रस्त्याचे काम तात्काळ सुरू अन्यथा लोकशाही मार्गने आंदोलन- विनायक शंकुरवार

परळी (प्रतिनिधी): शहरातील मुख्य रस्त्यापैकी एक असलेला इंडस्ट्रीयल एरिया येथील सुमारे दीड कोटी रूपये खर्च करून दोस्ती टी हाऊस ते माँ साहेब चौक पर्यंत करण्यात येत असलेल्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून याकडे पालिका प्रशासनाचे व पालिकेच्या इंजिनिअरचे दूर्लक्ष होत असून एक महिना झाले या रस्त्याचे काम पूर्णपणे बंद केले गेले आहे.या रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे व लवकरात लवकर करावे अन्यथा लोकशाही मार्गानने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा नेते विनायक शंकूरवार यांनी केली आहे.


परळी शहरातील सर्वात महत्वाच्या रस्त्यांपैकी ह्या रस्त्याची म्हणून ओळख असुन या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे व या रस्त्यावरून नेहमी जड वाहनाची मोठी वाहतूक असते. या रस्त्याचे काम पाहण्यासाठी नगर पालिकेचा इंजिनिअर सुद्धा फिरकत नसून या कामाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. या रस्त्याचे काम अत्यंत धिम्या गतीने होत होते व सध्या एक महिना झाला पूर्णपणे बंद झालं आहे. या रस्त्याच्या कामावर दबई न करताच डबर टाकले गेले आहे, त्याच डबरवर पुन्हा मुरूम टाकण्यात आला आहे. त्यानंतर त्याच्यावर लगेच दबई न करता, पाणी न मारता खडी अंथरली आहे. यापूर्वी याच रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणार्‍याच गुत्तेदारास पुन्हा काम देण्यात आले आहे. अर्धा रस्ता खोदून तसाच ठेवला गेला आहे. उर्वरित रस्ता पर्यायी वाहतूकीसाठी खुला असून रस्त्याच्या दुतर्फा कुठल्याही प्रकारचे रस्त्याचे काम चालू असल्याचे फलक लावले गेले नाहीत. मुख्य रास्ता असल्या मुळे रहदारी वाढत आहे व पायी चालण्याचे अवघड झाले आहे. रस्त्याच्या मधोमध असलेले भुयारी गटार योजनेचे केलेले चेंबर फुटले आहेत व त्यातील पाणी रस्त्यावर येत आहे, दुरूस्त न करताच व राहिलेले काम तसेच सोडून रस्त्याचे काम केले जात आहे.

येथील नागरिकांना याचा त्रास रोज सहन करावा लागत आहे तर काही जण या रस्त्याच्या खोदकामामध्ये पडल्याच्या घटनाही घडत आहेत. या रस्त्याच्या कामाकडे संबंधित गुत्तेदाराने व नगर पालिका प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालावे अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा विनायक शंकूरवार यांनी दिला आहे.

Back to top button