बीडब्रेकिंगमहाराष्ट्र

जाता – जाता नगराध्यक्षांनी किमान एवढे तरी पुण्य कमवावे …शिवसंग्राम शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे

बीड (प्रतिनिधी) नवरात्र महोत्सव येत असुन जागतिक महामारीमुळे सतत दोन वर्ष सण-उत्सव बंद होते परंतु देवादिकांच्या कृपेने व डॉक्टर ,शास्त्रज्ञ बांधवाच्या सहकार्याने या जागतिक महामारीवर जवळपास विजय प्राप्त केला जात आहे.

आई भवानीच्या कृपेने यावर्षी नवरात्र महोत्सव साजरा करण्यासाठी कोरोणाचे संकट हळूहळू दूर होत आहे परंतु बीड नगरपरिषदेने किमान जनाची नाही परंतु मनाची लाज बाळगून ह्या महोत्सवामध्ये बीड करांना दोन -तीन दिवसाला पाणी सोडावे … कारण बीडकरांचा अवस्था अशी झाली आहे . . . “नदीला पूर अणं धरण फुल , पंधरा-पंधरा दिवस,पाणीचं गूलं …बिंदुसरा नदी दुथडी भरून वाहत आहे नदीनाले एक झाले आहेत रस्त्यावरचे पाणी घरात जात आहे स्वराज्य नगर मध्ये तर तलावाचे स्वरूप आले अशा अवस्थेमध्ये दहा -पंधरा दिवसाला नगरपरिषद पाणी सोडते उन्हाळ्यामध्ये अशी अवस्था असेल तर आपण समजू शकतो परंतु भर पावसाळ्यामध्ये एवढी पाणी टंचाई नगरपरिषद का दाखवते हेच कळत नाही ?

पूर्वी प्रस्थापित अस्पृश्य लोकांना पाणी पिण्याच्या हक्कापासून वंचित ठेवत असत … रस्त्याने फिरणारी कुत्री – मांजरे पाणी प्यायची परंतु अस्पृश्य लोकांना पाणी दिले जात नव्हते पाण्यापासून वंचित ठेवले जात होतं …दिवस गेले ,स्वातंत्र्य मिळालं 75 वर्ष लोटली परंतु आजचे प्रस्थापित जनतेला पाणी पिण्याच्या हक्कापासून वंचित ठेवतात हे तुमच -आमचं दुर्दैव आहे.

आज शहरात रस्ते धड नाहीत,आरोग्याच्या सुविधा नाहीत राजकारण एकदम खालच्या स्तरावर जाऊन केले जात आहे . . चालू काम टक्केवारीच्या वादातून बंद पाडले जाते आहे आणि दुसर्‍याने चालू केला तर पहिल्याने रुसुन बसायच क्षीरसागरच्या वैयक्तिक वादांमध्ये बीडची जनता भरडली जाते आहे म्हणून शिवसंग्रामने नुकतेच भीक मांगो आंदोलन केले व या मधून आलेले पैसे नगरपरिषदेच्या अधिकाऱ्याकडे सुपूर्द केले आणि हा एकदाचा वाद मिटवून कामे पुर्वरत चालू करावे असे निवेदन देण्यात आले …नेतृत्व हे जनविकासासाठी असते … समाजाच्या विकासासाठी वा राष्ट्र विकासासाठी असते …परंतु बीडचे प्रस्थापित नेतृत्व हे जनविकासासाठी नसून स्वार्थासाठी आहे, सत्ता काबीज करण्यासाठी आहे, पैसा कमवण्यासाठी आहे ,माया जमविण्यासाठी आहे . . . . हेच यामधून सिद्ध होते

एकाच घरात राहायचं आणि सत्तेसाठी दोन पक्ष दाखवायचे …यांचे किचन एक , स्वयंपाकी एक . यांचे ड्रायव्हर एक … लक्ष्मिपूजन एकत्रित करायचे … आणि दोघामध्ये तिव्र संघर्ष आहे असे भासवायचे .. म्हणजे कार्यकर्ते जाग्यावरचं दाबून मारायचे .. म्हणजे “तोंड दाबून , बुक्क्याचा मारं ” … असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही आता यांचे भिंग फूटले आहे . . जणनेने पुर्णपणे पारखले आहे . . आता चुकिला माफी नाहिच … परिवर्तन अटळ आहे

ज्या बीडकरांनी विश्वास दाखवून 35 ते 40 वर्षांपासून एक हाती सत्ता प्रस्थापितांना दिली परंतु त्याच्या वापर प्रस्थापितानी स्वार्थासाठी केला हेच यामधून दिसून येते. ज्यावेळी बीडकरावर कोरोना महामारीचे संकट आले तेव्हा प्रस्थापित नेतृत्व जनतेला वाऱ्यावर सोडून बिळात लपून बसले ….तेव्हा आ.विनायक मेटेनी जनतेला धीर देत 200 बेडचे स्वंय अर्थसहाय्यातून प्रशस्त कोरोना हॉस्पिटल स्थापन केले त्यांना आधार देत बीडकरांचा विश्वास सार्थ ठरवला.

आज महापूर येतो परंतु पिण्यासाठी पाणी नाही किंवा कोणत्याही सोयी साठी पुढे येत नाही हे फक्त टक्केवारी संवाद करतात आणि कामे बंद पडतात ते जनतेच्या लक्षात आले आहे की जनता यांना पाणी पाजले शिवाय सत्तेपासून हाकलून दिल्याशिवाय राहणार नाही काय करता

सत्ताधाऱ्यांनी मात्र स्वतःसाठी रोज टॅंकरने पाणी भरायचं आणि जनतेला पंधरा – पंधरा दिवस पाणी द्यायचं नाही हे म्हणजे असं झालं की ..18 व्या शतकात फ्रान्समध्ये तेथील जनता भाकरीसाठी रस्त्यावर उतरली असता तेथील राणीने “भाकरी मिळत नसेल तर केक खा ” असा सल्ला जनतेला दिला होता … असचं काहिसं नेतृत्व बीडकरांना लाभलं हे तुमचं – आमचं दुर्दैव आहे. आता याचा हिशोब चुकता करण्याची वेळ झाली आहे … ती मतदानातून दाखवून देवून बीडकर निश्चितपणे बदल घडून आणतील असा विश्वास आहे

सत्तेसाठी हे आघाड्या काढतील … पक्ष सोडण्याचा नाटक करतील …चार – चार ठिकाणी घरातली माणसे उभी करतील आणि फक्त नगरपरिषदेची सत्ता कशी काबीज करता येईल यावरचं रांत्र – दिवस विचार करतील पणं जणतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कधिचं तत्परता दाखवणार नाहीत …. उलट एखादा रस्ता खोदून ठेवता येईल का ? हा विचार कृतितून दाखवून देतील … कोणाच्या घरावर, प्लॉटवर आरक्षण टाकतील .. घरे पाडण्यासाठी जेसीबी पाठवतील …कोणाला कोणत्या गुन्ह्यात अडकवायचं ? कोणत्या नगरसेवकाची कशी बदनामी करायची आणि कोणाला कशा पद्धतीने मॅनेज करायचं … एवढंच राजकारण या प्रस्थापितांनी केलं


बीडकरांना एकमेव खमक्या पर्याय आणि तो म्हणजे शिवसंग्राम हा होय ….शिवसंग्रामच्या एकहाती सत्ता देऊन कायमस्वरूपी बिडकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सन्माननीय आ.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बीड नगर परिषद निवडणूक लढवली जाईल आणि बहुमताने शिवसंग्रामचे नगरसेवक निवडून येतील आणि हा शेतकऱ्यांचा पुत्र प्रामाणिकपणे व कायमस्वरूपी बीडकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करेल आणि आपला विश्वास सार्थ ठरवेल

Back to top button