आमदार-खासदारांनी जेष्ठ नागरिकांकडे लक्ष द्यावे – ॲड. डॉ. अरुण जाधव

आमदार-खासदारांनी जेष्ठ नागरिकांकडे लक्ष द्यावे – ॲड. डॉ. अरुण जाधव
जेष्ठांच्या योजनांकडे दुर्लक्ष नको; अन्यथा आंदोलन
कर्जत / जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ फेसकॉम मुंबई व प्रादेशिक विभाग अहिल्यानगर, वंचित बहुजन आघाडी व महाराष्ट्र जेष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध मागण्यासाठी आज दिनांक ३० मार्च २०२६ रोजी येथील सामाजिक कार्यकर्ते शब्बीर पठाण ॲड.डॉ अरुण जाधव तसेच शशिकांत पाटील सोमनाथ भैलुमे दत्ता भालेराव यांच्या नेतृत्वाखाली जेष्ठ नागरिकांच्या १९ मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.
सदर मोर्चामध्ये कर्जत तालुक्यातील खेड्यापाड्यातून वयोवृद्ध महिला, विधवा परितक्ता एकल, लोककलावंत तसेच जेष्ठ व्यक्तींचा सहभाग होता.प्रत्येक व्यक्तींची शासकीय लाभ मिळण्यासाठी धडपड होती मोर्चाची सुरुवात मराठी मुलांची शाळा ते कर्जत तहसील कार्यालयापर्यंत रॅली स्वरूपात काढण्यात आली. जवळपास पाचशे ते सहाशे महिला पुरुष यांचा सहभाग होता.
यावेळी ॲड.डॉ.अरुण जाधव म्हणाले की, आमचा लढा संविधानिक मार्गाने आहे ज्या-ज्या वेळेस लाभार्थी कर्जत तहसील ऑफिसला येतात. त्यावेळेस तहसीलदार साहेब उपस्थित नसतात. तहसीलदार साहेबांचे दालन सतत बंद का असते? संजय गांधी निराधार योजनेची मासिक मीटिंग दर दोन महिन्याला का होते ,असा सवाल विचारण्यात आला.
लाभार्थ्यांना जन्म दाखले,जेष्ठ विधवा महिलांना पंधराशे ऐवजी पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे.घरकुल, रेशन कार्ड,मतदान कार्ड,आधार कार्ड देण्यात यावे.
कर्जत/जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा .राम शिंदे तसेच खासदार निलेश लंके यांनी या प्रश्नांकडे डोळसपणे बघावे, अन्यथा दोन आमदार आणि एक खासदार यांच्या निवासस्थाना समोर जेष्ठ नागरिकांना घेऊन तीव्र स्वरूपात आंदोलन करेल असे ॲड.डॉ.अरुण जाधव म्हणाले.
निवेदनात दिलेल्या एकोणीस मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तहसील कार्यालय कर्जत येथे जीवन यात्रा संपवेल असे यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते शब्बीर पठाण यांनी इशारा दिला.
या आंदोलनात शशिकांत पाटील, सोमनाथ भैलुमे, तुकाराम पवार, चांगदेव सरोदे,भुजबळ महाराज, संतोष चव्हाण आदींनी भूमिका मांडल्या.यावेळी कर्जत येथील तहसीलदार रवि सतवन यांना निवेदन देण्यात आले .
यावेळी वंचित बहुजन व आघाडीचे तालुकाध्यक्ष दत्ता भालेराव , जिल्हा उपाध्यक्ष लखन पारसे , तुकाराम पवार, संजय शेलार , विकास समुद्र , शंकर गाडे, रवि सोनवणे, बाबासाहेब,काजूरी पवार, शितल काळे ,दिगंबर पवार, मनीषा सानप, छायाताई कांबळे, विजयाबाई गोरे यांच्यासह अनेक वृद्ध शेतकरी शेतमजूर उपस्थित होते.



